खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा , यांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक . १९ / ०८ / २०२१ खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा , पुणे शहर बेकायदेशीर रित्या लोखंडी कोयता बाळगणा – या आरोपी सह व गंभीर गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीच्या खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर ने आवळल्या मुसक्या

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दिनांक १७/०८/२०२१ रोजी खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील सपोनि / बुवा , सपोफौ वांजळे , सपोफौ ओबासे , पोना / रमेश चौधर , पो.ना / दुर्योधन गुरव व पोशि / अमर पवार असे गुन्हयातील पाहिजे आरोपींचे शोध कामी आमचे खाजगी वाहनांवरुन पेट्रोलिंग करीत असताना एक इसम लोखंडी कोयता कंबरेला लावुन होम हॉस्पिटल समोर , पी.एम.सी कॉलनी , राजेवाडी , नाना पेठ , पुणे येथे येणार आहे अशी माहिती मिळाली . त्यास वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रदीप ऊर्फ बाबा आनंद गवळी वय – ३२ वर्षे , रा , पी.एम.सी कॉलनी , बी बिल्डींग , रुम नंबर ३४ , राजेवाडी , नाना पेठ , पुणे असे असल्याचे सांगितले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला पाठीमागे एक लोखंडी कोयता मिळाला आला आहे . सदर आरोपी विरुध्द समर्थ पो . स्टे गु.र.नं. १४३/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५ ) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . तसेच खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार पो.हवा .५३८७ संजय भापकर व पो.शि. प्रफुल्ल चव्हाण यांना भारती विदयापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. ४७०/२०२१ भादंवि कलम ३९९ , ४०२ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे प्रसाद ऊर्फ मंक्या शेषेराव सातपुते वय १९ वर्षे , रा . सध्या स.नं. २३ , चिंतामणी सदन , गणेश चौक , आंबेगाव पठार , धनकवडी , पुणे मुळ पत्ता सातपुते गल्ली . खातिब लेंडी नाका , अंबाजोगाई , बीड , महाराष्ट्र हा शनिनगर , पाण्याच्या टाकीजवळ , कात्रज , पुणे येथे येणार असल्याची बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती . सदर बातमीचे अनुषंगाने सापळा रचुन प्रसाद ऊर्फ मंक्या शेषराव सातपुते वय १९ वर्षे , रा.स.नं .२३ चिंतामणी सदन , गणेश चौक , आंबेगाव पठार , धनकवडी , पुणे यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी भारती विदयापीठ पो.स्टे च्या ताब्यात देण्यात आलेले आहे . तसेच खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार पो.ना.विजय कांबळे व पो.शि.हनुमंत कांदे यांना मुंढवा पो.स्टे गु.र.नं .१२३ / २०१९ भादंवि कलम ३२४.५०४.३४ व हवेली पो.स्टे गु.र.नं. २४१/२०१२ भादंवि कलम ३२३,३२४,१४३.१४७,५०४,५०६ मधील पाहिजे आरोपी नामे विशाल ऊर्फ गोरख सोनावणे हा जांभुळवाडी रोड , शनि नगर मंदिरासमोर , कात्रज , पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती समजल्याने सदर आरोपीस त्या ठिकाणाहून ताब्यात घेवून त्यास पुढील तपासकामी मुंढवा पो.स्टे च्या ताब्यात देण्यात आलेले आहे . अशाप्रकारे खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहे .

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.अशोक मोराळे , पोलीस उपआयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री . सुरेंद्रनाथ देशमुख , यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखेचे व.पो.नि. श्री महेंद्र जगताप , स.पो.नि.संदीप बुवा , पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे , यशवंत ओबासे , संजय भापकर , रविंद्र फुलपगारे , मधुकर तुपसौंदर , नितीन कांबळे , रमेश चौधर , गजानन सोनवलकर , दुर्योधन गुरव , अमोल आवाड , राजेंद्र लांडगे , प्रफुल्ल चव्हाण , नितीन रावळ , विवेक जाधव , विजय कांबळे , अमर पवार , हनुमंत कांदे , पिराजी बेले यांनी ही कारवाई केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *