मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार स्वारगेट पोलीसांकडुन पाठलाग करुन आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

विवाहीत प्रवासी तरुणीवर बलात्कार करुन पळणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलीसांकडुन पाठलाग करुन अटक.

स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार ; दोन तासात अटक … स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मागदर्शनाखाली आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश आले आहे .

पिडीत महीला व तीचा नवरा यांनी घरातुन पळुन जावुन ०१ वर्षापुर्वीच लग्न केले आहे. त्यानंतर ते दोघेजन खामगाव येथिल शेगाव येथिल हॉटेलमध्ये वेटरचे व इतर कामे करीत होते. ते दोघेजन २ दिवसांपुर्वीच कामाच्या शोधात पुण्यात आले होते. शनिवारी कात्रज शिवभोजन थाळी या खानावळीत दिवसभर काम करुन रात्री उशीरा स्वारगेट स्टेशनवर चौकातील झोपण्यासाठी चालत येत असताना त्यांना स्टॅन्डजवळील कॅनॉलच्या फुटपाथजवळ पार्क असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक अटक

आरोपी नवनाथ शिवाजी भोंग वय-३८ वर्षे रा. सतीश मुरलीधर ढोले, महाविर शहा, सॅलीसबरी पार्क, महर्षीनगर पुणे मुळगाव – मु.पो. वडापुरी ता इंदापूर जि.पुणे .

याने त्यांना थांबवुन केली. त्यावेळी त्यांनी ते स्टॅन्डवर झोपण्याकरीता जात असल्याचे सांगितलेने आरोपीने त्या दोघांना गाडीत आराम करा ते जास्त तुमच्यासाठी सुरक्षित राहील असे सांगितल्याने त्यांचा त्याचेवर विश्वास बसल्याने ते टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये झोपले. पहाटे ०३/३० वा चे सुमारास महीलेच्या पतीला टॉयलेटला जायचे असल्याने आरोपी त्याला चालत घेवुन स्वारगेट स्टॅन्डला घेवुन गेला. तो स्वच्छतागृहात जाताच आरोपी त्याला तसाच सोडुन पळत गाडीकडे येवुन
गाडी चालु करुन तो आडबाजुच्या अंधारात घेवुन गेला.

पीडीत महीलेला ठार मारण्याची धमकी देवुन
व मारहान करुन आरोपीने तिच्यावर गाडीतच दोन वेळा बलात्कार केला व नंतर तीला खाली उतरवुन निघुन गेला.

याची तक्रार दिल्याने स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. १०९/२०२२ भादवि कलम ३६३,३७६,३७६ (२)(एन), ३२३, ५०४,५०६ अन्वये, आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्याने तपासपथकातील पोलीस अंमलदार दिपक खेंदाड, किरण भरगुडे यांनी पी.एम.पी.एम.एल.चे स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहुन पांढऱ्या रंगाच्या ट्रव्हल्सचा अर्धवट नं. ६६ हि कर्नाटक येथिल पॅसेंजर भरुन कात्रजचे दिशेने गेल्याचे दिसत असल्याने त्यावरुन सरकारी गाडी घेवुन सदर गाडीचा शोध घेत असताना गाडीचे ड्रायव्हरने पोलीस गाडी आल्याचे पाहुन गाडी जोरात पळवुन जावु लागला असता त्याचा बिबवेवाडी येथेपर्यंत पाठलाग करुन त्यास गाडी थांबविण्यास भाग पाडले असता

आरोपी नवनाथ शिवाजी भोंग वय-३८ वर्षे रा.मु.पो.वडापुरी ता इंदापूर जि. पुणे हा गाडी सोडुन पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे.


सदरची कामगीरी पोलीस अंमलदार दिपक खेंदाड, किरण भरगुडे व मुकुंद तारु .

यांनी श्री.सागर पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ-२ पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सोो स्वारगेट विभाग पुणे शहर, श्री. अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्वारगेट पो.स्टे. पुणे, श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पो.स्टे,पुणे श्री. अमोल रसाळ, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री. तुषार भोसले, श्री. अशोक येवले, व आर. आर. पाटील यांचे मार्शदर्शनाखाली केली आहे.

दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्री. अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर हे करत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *