वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी ५, हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी ५, हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार आणि होमगार्डवर पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाने लोणी काळभोर, पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदार मुकुंद शंकर रणमोडे वय ४९, वर्ष आणि होमगार्ड गजेंद्र माणिक थोरात वय,३५, वर्ष यांच्याविरुद्ध बुधवार (दि.३१) गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करणेसाठी तक्रारदार यांचेकडे ५०००/- रु ची लाच मागणी करुन त्यापैकी रु २०००/- स्विकारले असता दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत ३६ वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. आरोपी मुकुंद शंकर रणमोडे, हे, लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पथकाने ३० ऑगस्टआणि ३१ ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांना वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड, गजेंद्र माणिक थोरात,याने ५,हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये २, हजार रुपये मागणी केली. तर पोलीस हवालदार रणमोडे, होते ,यांनी लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले. पुणे एसीबीने बुधवारी दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सापळा व तपास अधिकारी : विजयमाला पवार -पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि पुणे मार्गदर्शन अधिकारी :
श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे परिक्षेत्र. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.लोणी काळभोर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad