फोटो काढना ईचलान मशिनीचाच वापर व्हावा वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो न काढण्याच्या सूचना.अपर पोलिस महासंचालकांचे आदेश.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
फोटो काढना ईचलान मशिनीचाच वापर व्हावा वैयक्तिक मोबाईल मध्ये फोटो न काढण्याच्या सूचना .
September 2 , 2022
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS NEWS ) प्रतिनिधी .
मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलीसांना ई चालन मशिन देण्यात आली पण पोलीस आपल्या खाजगी मोबाईलने वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्यावर ई चालनची कार्यवाही करतात . वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी एक आदेश जारी करून पोलीसांनी खाजगी मोबाईलचा वापर न करता ई चालन मशीनचाच वापर करून वाहन चालकांचे मोटार वाहन कायदा तोडल्यानंतरचे फोटो काढावेत असे सांगितले आहे .
खाजगी मोबाईलद्वारे कसुरदार वाहन चालकांचे फोटो आता काढता येणार नाहीत .
वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणा – या नागरिकांचे फोटो काढून नंतर अपलोड करून कारवाई केली जाते , तर काही वेळा सेटलमेंट करून वाहने सोडली जातात . परंतू आता वाहतूक पोलिसांना स्वताच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्ये फोटो न काढण्याचे आदेश पारित झाले आहे . फक्त ई – चलान मशीनद्वारे फोटो काढून कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व देण्यात आले आहेत . त्यामुळे जे वाहतूक पोलीस कारवाई करताना आदेशाचे पालन करताना दिसून येणार नाहीत ,
त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिली आहेत .
ई चालन करतांना स्वत : च्या खाजगी मोबाईलचा वापर करतील अशा पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर योग्यती कार्यवाही करावी असे या पत्रात नमुद आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती . त्या पूर्वीच २०२० मध्ये वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांना व नोडल अधिकाऱ्यांना पत्राद्वारे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर न करता सर्व कारवाई ई – चलान केली जाईल याबाबत खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्या होत्या . मात्र तरी देखील त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होताना दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले होते . त्यामुळे पुन्हा एकदा अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाकडून सूचना देण्यात आले आहेत . आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून नंतर ई – चलान मशीनमध्ये अपलोड करतात तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता केवळ नंबर प्लेटचा फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखण्यास अडचणी निर्माण होते , याबाबतचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अर्ज केल्याने पोलीस महासंचालक कार्यालय वाहतूक विभाग मुंबई येथून पुन्हा नव्याने आदेश देण्यात आले आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad