पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन कडून कोकेन जप्त पुणे शहर गुन्हे शाखेचा छापा.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन कडून कोकेन जप्त पुणे शहर गुन्हे शाखेचा छापा.
रेकॉर्डवरील नायजेरीयन आरोपीस जेरबंद करुन त्याचे कडुन २,२०,०८,०००/- रुपये किंमतीचे ०१ किलो ०८१ ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त.
पुणे,दि.०९:- पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक १ यांनी दि ०८/१२/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरात सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना स्टाफ मधील अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन इसम नामे फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई.उंड्री मंतरवाडी परिसरात कोकेन या अंमली पदार्थ विक्री करीत आहे..
बातमीच्या अनुषंगाने त्यानंतर पोलिसांनी उंड्री येथील उंड्री चौकातून मंतरवाडीकडे जाणारे रोडवरील आर पॉईन्ट सोसायटीचे समोर, सार्वजनिक रोड समोर सापळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ०१ किलो ८१ ग्रॅम कोकेन कि रु २,१६,२०,०००/- चा सहा मोबाईल फोन कि रु १६०००/- चे एक कार कि रु ३०,००००/- ची दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे कि रु २०००/- रोख रुपये ७०,०००/- असा ऐवज व कोकेन हा अमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याच्याकडून एकूण २,२०,०८,०००/-मुद्देमाल व कोकेन जप्त केले आहे.
फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई.५० वर्षे सध्या रा. शकुंतला कानडे पार्क सर्व्हे नंबर २८/२ बी-१ विंग ११ मजला फ्लॅट नंबर ११०४ उंड्री पुणे मुळ रा. नायजेरिया यांस असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रवीण उत्तेकर यांनी फिर्याद दिली आहे.
यापूर्वी आरोपीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल असून, काही दिवसांपूर्वी तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याचेवर यापुर्वी कारवाई केली होती.
सदर कारवाई ही अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, गजानन टोम्पे, सहा पो आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे , शहर कडील विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad