मोक्का गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मोक्का गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

बिबवेवाडी परिसरात संघटीत गुन्हेगारी करून दहशत माजविणारे व मोक्का गुन्ह्यात फरार असणार्‍या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलीसांनी मोठ्या शिफातीने अटक केली आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. १६२/२०२२ दाखल मोक्का गुन्ह्यातील फरार असणारा टोळी प्रमुख अनिल रमेश चव्हाण व त्याचा साथीदार रोहित हेमंत बोदरे पोलीसांना गुंगारा देवून फरारी होते. सदर गुन्ह्यातील इतर ७ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

बिबवेवाडी येथील अंमलदार अतुल महांगडे यांना गोपनिय माहिती मिळाली कि टोळी प्रमुख अनिल रमेश चव्हाण व त्याचा साथीदार रोहित बोदरे हे याच्या घरी येणार आहेत. नमुद पाहीजे आरोपी हे रोहीत बोदरे याचे घरी येणार असल्याची खात्रीशिर माहीती मिळालेने लागलीच सपोनि श्री प्रविण काळुखे यांनी सदर बाबत मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , वानवडी विभाग , पुणे शहर यांना तसेच मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक , बिबवेवाडी पोलीस ठाणे , पुणे यांना मिळालेली माहीती कळविली असता त्यांनी मिळालेले माहीती प्रमाणे सापळा रचून कारवाई करणे बाबत आदेशित केले त्यांचे सूचनेप्रमाणे सापळा कारवाई करत टोळी प्रमुख अनिल रमेश चव्हाण व रोहित बोदरे यास मोठ्या शिफातीने ताब्यात घेतले.

सदर कारवाई नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, विक्रांत देशमुख उपायुक्त परिमंडळ-५, श्रीमती पोर्णिमा तावरे सहा.पो.आयुक्त वानवडी, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव, सपोनि प्रविण काळुखे, पो.हवा.जाधव, पो.शि.महांगडे, येवले, मोरे, पाटील, काळे, नवले, धुमाळ यांनी केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *