सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला,पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसायपुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल,
पुणे : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पथकाने बनावट ग्राहक पाठवू खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत होता. ही कारवाई मंगळवारी (दि.12) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बालाजी नगर येथील सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे केली आहे.

याप्रकरणी उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजी हौसींग सोसायटी, बालाजी नगर, पुणे) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व आयपीसी 370 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय नारायण राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बालाजी नगर येथील ग्रंथ कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती.आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची पुष्टी केली आहे. त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.आरोपी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजिवीका भागवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप देशमाने करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in