अल्पवयीन वाहनचोरटा ताब्यात,मुंढवा पोलिसांची कामगिरी एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल केला हस्तगत.,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
१० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन घेतले ताब्यात त्याचेकडुन एकुण २ लाख ७५ हजार रु किचा मुद्देमाल केला हस्तगत,मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ०५, पुणे, श्री. आर. राजा यांनी परीमंडळ-०५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम राबवीणेबाबत पोलीस ठाणेस मिटिंग घेवुन आदेश दिले होते.
पुणे : दिनांक १५,(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या अल्पवयीन वाहन चोराकडून २ लाख ७५ हजारांच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून वाहणकहोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मुंढवा पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी अल्पवयीन चोरटा १७ वर्षांचा असून मुंढवा भागात राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एक दुचाकी चोरीला गेलेली होती. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप जोरे यांना पथकासह वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

सहायक निरीक्षक संदीप जोरे मुंढवा पो स्टे पुणे शहर,
त्यानुसार हे पथक गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार दिनेश राणे यांना यापुर्वी वाहन चोरीच्या गुन्हयात पकडला गेलेला अल्पवयीन आरोपी दुचाकीवर जात असताना दिसला. त्याला थांबविण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या वाहनाबाबत पोलिसांनी विचारणा केली. मात्र, त्याला समर्पक उत्तर मिळाले नाही. पोलीस ठाण्याचे अभिलेख पडताळुन पाहीले असता त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची नोंद मिळाली.त्या अल्पवयीन मुलाच्या पालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. पालकांच्यासमक्ष त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हडपसर, मुंढवा व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून एकुण १० दुचाकी चोरल्याचे समोर आले. या वाहनाचा शोध घेण्यात आला. ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबाबत वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे म्हणाले, परीमंडल पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी वाहनचोरीच्या गुन्हे नियंत्रणात आणण्याच्या तसेच हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने चोरीचा वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना आम्ही तपास पथकाला दिलेल्या होत्या. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.मुंढवा पोलीसांना यश आले आहे. त्याचेकडुन एकुण २,७५,०००/- रु किचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, मुंढवा पो स्टे पुणे शहर,

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, श्रीमती. अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे पुणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती. संगिता रोकडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, पोलीस अंमलदार, दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in