Traffice Police

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांची उत्तम कामगिरी
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक

पुणे – गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला गावठी पिस्तूलसह अटक करण्यात आली. ही उत्तम कारवाई पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने केली.
ONLINE PORTEL NEWS
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध्य अग्निशस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार २६ जून २०२१ रोजी पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना खबऱ्याने सराईत आरोपीची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने शिवम आनंत बरिदे (२१, रा. खडकवासला, तालुका हवेली, जिल्हा पुणे) याला खडकवासला परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. शिवम बरिदे हा सराईत आरोपी असून त्याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे अमलीपदार्थविरोधी कायद्यानुसार तसेच मारामारी, गंभीर दुखापत करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस पुढील कारवाईसाठी हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, व या पथकाने केली व तांत्रिक मदत सुनिल कोळी व सायबर पोलीस ठाण्याचे चेतन पाटील यांनी केली.

ONLINE PORTEL NEWS 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *