स्थानिक गुन्हे शाखेने पकडला लाखोंचा गुटखा

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

महाराष्ट्र पोलीस पोलीस अधिक्षक कार्यालय , धुळे ( स्थानिक गुन्हे शाखा , धुळे )

ONLINE PORTEL NEWS 9822331526

महाराष्ट्र पोलीस पोलीस अधिक्षक कार्यालय , धुळे ( स्थानिक गुन्हे शाखा , धुळे )

दिनांक २६/०६/२०२१ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला लाखोंचा गुटखा परराज्यातुन महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पानमसाल्याची तस्करी होत असलेबाबत पोलीस अधीक्षक श्री . चिन्मय पंडित , धुळे यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते . सदर आदेशानुसार श्री.शिवाजी बुधवंत , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , धुळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना सदर बाबत माहिती काढुन कारवाई करणे बाबत आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या . त्यानुसार दिनांक २५/०६/२०२१ रोजी रात्री २२.३० वा . च्या सुमारास गुप्त बातमी मिळाली की , निजामपुर गावात आदर्श विद्या मंदीर समोरील वासखेडी रोडवर एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन उभे आहे , अशी बातमी मिळाली . त्याप्रमाणे सदर ठिकाणी पथका रवाना केले असता , तेथे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच .१८ / बी.जी. – ०४९५ वाहन व एक इसम असे उभे होते . सदर इसमास त्याचे नावगांव विचारता , त्याने त्याचे नाव प्रशांत जगन्नाथ बदामे , वय -२६ वर्ष , रा.क्वॉलिटी प्रोव्हीजन शेजारी , निजामपुर ता.साक्री जि.धुळे असे सांगुन सदर वाहन त्याचे स्वतःचे असल्याचे सांगीतले . त्यास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता , त्याने सदर वाहनात मिरची असल्याचे सांगुन उडवाउडवीचे उत्तरे दिली . वाहनातील मालाबाबत संशय आल्याने तपासणी केली असता , सदर वाहनात खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल सुगंधी गुटखा पानमसाला ( विमल ) मिळुन आला .

१ ) रु .१३,६१,३६० / – एका गोणीत २०८ विमल सुगंधी पान मसाला पाऊच प्रत्येकी किंमत १८७ / – रु . प्रमाणे . असे एकुण ३५ गोण्या .

२ ) रु .२,४०,२४० / – एका गोणीत २०८ विमल व्ही .१ तंबाखु पाऊच प्रत्येकी किंमत ३३ / – रु . प्रमाणे . असे एकुण ३५ गोण्या .

रु .४,००,००० / – एक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच .१८ / बी.जी. – ०४९५ . जु.वा.कि.अं.

रु .२०,०१,६०० / –

एकुण किंमत वरील प्रमाणे प्रतिबंधित असलेला विमल नावाचा पानमसाला गुटखा व बोलेरो पिकअप वाहन जप्त करुन तो अन्न व औषध प्रशासन , धुळे यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई श्री.चिन्मय पंडित , पोलीस अधीक्षक , धुळे व श्री.प्रशांत बच्छाव , अपर पोलीस अधीक्षक , धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोनि.शिवाजी बुधवंत , पोसई योगेश राऊत , पोसई.सुशांत वळवी , पोहेकॉ . संजय पाटील , पोहेकॉ.संदीप थोरात , पोहेकॉ.प्रकाश सोनार , पोना.संतोष हिरे , पोना.संदीप सरग , पोकॉ.योगेश जगताप , पोकॉ.किशोर पाटील अशांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *