चोरलेला मोबाईल OLX ओएलएक्सवर विकणारा जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

चोरलेला मोबाईल ओएलएक्सवर विकणारा जेरबंद
मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांची उत्तम कारवाई

मुंबई – रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरून ओएलएक्सवर विकणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. सदर कारवाई मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान तपासी पथकाने मोबाईल जप्त केला आहे.

ONLINE PORTAL NEWS
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी व वाढत्या मोबाईल चोरींच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत. सदर सूचनांचे पालन सर्वच लोहमार्ग पोलीस ठाणे करू लागले. शोधमोहीम सुरू असताना मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गु. र. क्र. १८७/२०२१ भादंवि कलम ३९७ ) गुन्ह्यातील आरोपी माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी आरोपी जय पटेल (१९, रा. मालाड, मुंबई) याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा घडला गुन्हा
१९ जून २०२१ रोजी चेतन मसालिया (५२) हे ग्रॅन्टरोड येथे जाण्यासाठी बोरिवली स्थानकातून लोकलमध्ये बसले. मोटरमनपासून तिसऱ्या डब्यातून प्रवास करताना दादर रेल्वे स्थानकातून लोकल सुरू होताच एका चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशातून मोबाईल चोरून धावत्या लोकलमधून उडी मारली. काही समजण्यापूर्वी लोकल फलटातून निघाली होती. मोबाईल चोरणाऱ्या जय पटेल याला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्याने बोगस बिल तयार करून मोबाईल ओएलएक्सवर विकला होता, अशी माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्यामुळे या प्रकरणात ४२०, ४६५, ४६८, ४७१ या भादंवि कलमांची नव्याने नोंद करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा उलगडा पश्चिम परिमंडळचे उपायुक्त प्रदीप चव्हाण, मुंबई सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबुब इनामदार, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एस. घार्गे, हवालदार एस. एफ. सोनावणे, हवालदार एस. व्ही. बने, पोलीस नाईक व्ही. व्ही. जाधव, पोलीस नाईक एस. टी. महाडिक, पोलीस नाईक एम. डी. पाटील, पोलीस नाईक ए. व्ही. वळवी, पोलीस नाईक एन. डी. पाटील, पोलीस नाईक टी. एन. साळुंखे, पोलीस अंमलदार वाय. एन. बच्चे, पोलीस अंमलदार एन. एच. गुरव आदी लोहमार्ग पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *