खुन करुन परराज्यात परागंदा झालेल्या आरोपीस बिहार मधु केली अटक विमानतळ पोलीसांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अनैतिक संबंधातुन महिलेचा गळा आवळून खुन करुन परराज्यात परागंदा झालेल्या आरोपीस बिहार मधुन अटक : विमानतळ पोलीसांची कामगिरी.

अनैतिक संबंधातुन महिलेचा गळा आवळून खुन करुन परराज्यात परागंदा झालेल्या आरोपीस बिहार मधुन अटक केली आहे.

दिनांक ०६/०२/२०२२ रोजी एक महीला तिचे राहते घर मोझे आळी लोहगाव, पुणे येथे बाथरुममध्ये बेशुध्द अवस्थेत पडलेली असलेबाबत विमानतळ पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी पोउनि जाधव यांना माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन महिलेची पाहणी करता सदर महिलेचा संशयितरित्या मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले, तसेच त्याबाबत सदर महिलेचे पती यांनी त्यांची पत्नीचे यापुर्वीचा भाडेकरु इसम नामे मोहम्मद गुलाब मोहम्मद मुख्तार शेख वय ३२ वर्षे रा बिहार याचेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगुन त्यानेच पत्नी हिचा खुन केलेबाबत दि.०६/०२/२०२२ रोजी तक्रार दिल्याने विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर आरोपीचा विमानतळ पोलीस स्टेशन कडील विशेष पथक शोध घेत असताना गोपनिय बातमीदार तसेच मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपी हा त्याचे मुळगावी बिहार येथे रेल्वेने पळून जात असल्याची माहिती गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे यांना मिळाली. त्यांनी लागलीच सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक

श्री भरत जाधव यांना सांगुन विशेष पथकाची नेमणूक करुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे विशेष पथक बिहार येथे रवाना केले. विशेष पथक व स्थानिक पोलीस यांनी प्रथम आरोपीच्या राहत्या घरांभोवती सापळा रचुन त्यास ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता, आरोपीस पोलीस आल्याचे समजताच तो पळून जावु लागल्याने त्याचा सिनेस्टाईल पध्दतीने पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले व विमानतळ पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मंगेश जगताप हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री. नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. रोहीदास पवार, पोलीस उपायुक्त परि-०४ पुणे शहर श्री किशोर जाधव सहा पोलीस आयुक्त. येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे, सपोनि मिलींद पाठक, पोउनि एस ए जाधव, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश चेंडे विनोद महाजन, किरण अब्दागिरे, रिहान पठाण, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *