५ मिळकती पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधलेल्या वर कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
अनधिकृत बांधकाम वर पुणे महानगरपालिकेची कारवाई.
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे पेठ लोहगांव सर्वे नं २६० पैकीं वृंदावन कॉलनी लेन नं ५ येथील मान्य विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या १५ मी. डी.पी. रस्त्यामध्ये एकूण ५ मिळकती पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधलेल्या आहेत.
सदर बांधकामावर मे.उच्च न्यायालयामध्ये दावा क्रं ३९८८/२०२१ दाखल असुन मे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार वरील ५ मिळकतींपैकी कलवड रस्त्यालगत असलेल्या श्री गोविंद चौधरी व इतर यांच्या मालकिच्या अंदाजे ७०×२० फूट तळमजला+ पहिला मजला व श्री मलंग व इतर यांच्या मालकिचे अंदाजे ७० x२० फुट तळ मजला + दोन मजले यावर आज दि. १६/०२/२०२२ रोजी जॉ कटरच्या सहाय्याने एकुण २८०० चौ. फुट कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई दरम्यान १ जॉ कटर , २ जेसीबी अतिक्रमण विभागाकडील, पोलिस निरिक्षक श्री राजु अडागळे व १२ पोलिस स्टाफ तसेच विमानतळ पोलिस स्टेशन मधील ए.पी.आय श्री शिवदास लहाणे व इतर ५ महिला पोलिस व ५ पुरूष पोलिस उपस्थित होते.
सदर कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्रं ४ चे कार्यकारी अभियंता श्री रोहिदास गव्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान बांधकाम विकास विमाग झोन क्रं – ४ कडील उपअभियंता श्री राजेश शिंदे , कनिष्ठ अभियंता श्री फारुक पटेल व श्री कश्यप वानखेडे , सहाय्यक श्री पराग गोऱ्हे , श्री अशोक डड्डे, सौ. प्रतिक्षा म्हेत्रे, टुलिय अभियंता समीक्षा घरमठोक, सिराज पठाण, योगेश डोंगरे, शहाबाज शेख स्टाफ उपस्थित होते.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad