Police News

मोबाईल फोनची चोरी करणारी अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश.(पंधरा लाख रुपये) किमतीचे एकुण ७०अँड्राईड मोबाईल फोन.


बंडगार्डन पोलीस स्टेशनची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक १५/०२/२०२२ बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर

मोबाईल फोनची जबरी चोरी करणारी अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश , सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे एकुण ७० अँड्राईड मोबाईल फोन हस्तगत करुन ०५ आरोपींना अटक १७ गुन्हे उघडकीस , प्रशांत नेवे राहणार भुसावळ जि . जळगाव यांचा मुलगा गौरव हा पुणे शहरामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे .

दिनांक ०४/०२/२०२२ रोजी प्रशांत नेवे व त्यांचा मुलगा गौरव नेवे असे दोघे मुसावळ वरुन रेल्वेने सकाळी ०७.०० वाजता पुणे स्टेशन येथे आले होते . त्यांना त्यांचे नातेवाईकांचेकडे हडपसर येथे जायचे असल्याने त्यांचा मुलगा गौरव नेवे हा अलंकार थिएटर चौक , पुणे या ठिकाणी चौकात थांबुन मोबाईल फोन वरुन ओला कॅब बुक करीत असताना सकाळी ०७.३५ वा.चे सुमारास मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांचे पैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारुन चोरून नेले बाबत प्रशांत नेवे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दोन अज्ञात इसमांचे विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि . क्रं .२३/२०२२ मा द वि कलम ३९२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

अशा प्रकारचे गुन्हयांना आळा बसावा व गुन्हयांचा छडा लावणे या करीता श्री.सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ पुणे यांनी योजना तयार केली . त्या प्रमाणे श्री . यशवंत गवारी , सपोआ लष्कर विभाग ,व श्री प्रताप मानकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती अश्विनी सातपुते , पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक श्री.राहुल पवार यांनी तीन पथके तयार करुन पुणे शहर तसेच पुणे स्टेशन परिसरातील घडलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करुन पोलीस अंमलदार सागर घोरपडे यांना मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा करणारे आरोपी

१.) विकास वाघेरे वय २२ वर्षे रा . अशोकनगर येरवडा पुणे ,

२ ) अनिकेत लक्ष्मण कांबळे वय २० वर्षे रा . येरवडा पुणे यांना त्यांचे मोटार सायकलसह ताब्यात घेऊन त्यांना अटक करुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी तक्रारदार श्री.नेवे यांचा मोबाईल चोरी केल्याची कबुली देवुन मोबाईल फोन काढुन दिला . त्यांचेकडे अधिक तपास करता मोबाईल फोनची जबरी चोरी करणारे त्यांचे साथीदार

१) एलिसन विल्सन पिल्ले , वय १९ वर्षे , रा . श्रास्त्रीनगर , घोरपडी गाव , पुणे ,

२ ) तेजस गुलाब बाटे , वय २७ वर्षे , रा . किरकिटवाडी , सिंहगड रोड , पुणे ,

३ ) निखील रामा पुजारी , २८ वर्षे , रा . घोरपडी गाव , डोबरवाडी पुणे

यांची नावे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयामध्ये अटक करुन चोरीचे एकुण २० मोबाईल फोन हस्तगत केले आहेत .आरोपींचेकडे गुन्हयाची पध्दत व चोरी केलेल्या मोबाईल बाबत तपास केला असता ते पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन चोरी करीत असत व चोरी केलेले मोबाईल फोन डोबरवाडी , घोरपडी , पुणे येथील आरोपी निखिल रामा पुजारी याचेकडे दिले नंतर तो त्याचा साथीदार – शिवा लक्ष्मण पुजारी रा . डोबरवाडी , पुणे यास विकत असल्याचे समजुन आले . शिवा पुजारी हा चोरीचे मोबाईल फोन हे गुजरात राज्यातील इसम नामे कासिम या व्यक्तीचे सांगणे वरुन वेगवेगळ्या कुरीयर सर्व्हिसद्वारे मुंबई , अहमदाबाद , व त्या नंतर कोलकता , पश्चिम बंगाल राज्यात त्यांचे हस्तकांकडे पाठवित असल्याची माहिती सांगितली .

दिनांक १०/०२/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वाजता आरोपी शिवा पुजारी यास हडपसर येथुन एका लॉजवरून ताब्यात घेतले असता त्याने काही वेळापूर्वी चोरीचे ५० मोबाईल फोन कुरीयरद्वारे मुंबई येथे एका मालवाहुन टेंपोने पाठविले असल्याची माहिती दिल्याने , टेंपोचा पाठलाग करुन टेंपोतील चोरीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत .

बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने एकुण पंधरा लाख रुपये किमतींचे मोबाईल आरोपींचेकडुन जप्त केले आहेत .

सदरची कार्यवाही श्री . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , श्री.सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ श्री.यशवंत गवारी , सहा . पोलीस आयुक्त , लष्कर विभाग पुणे , श्री.प्रताप मानकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे , श्रीमती अश्विनी सातपुते , पोलीस निरीक्षक गुन्हे , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री राहुल पवार , पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकातील अंमलदार मोहन काळे , प्रताप गायकवाड , नितीन जगताप , सुधीर घोटकुले , सचिन भिंगारदिवे , अमोल सरडे , संजय वणवे , सागर घोरपडे , किरण तळेकर , अंकुश खानसोळे यांनी केली आहे . पुणे शहरातील मोबाईल चोरी संदर्भात नागरीकांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *