घातक हत्यार घेऊन फिरणारे आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ ने केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
घातक हत्यार घेऊन फिरणारा हत्यारसहित दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ कडून जेरबंद.
आज रोजी स्टाफ येरवडा व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना.
पोलीस अंमलदार अमोल सरतापे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,
कैलास स्मशानभूमी जवळ ,साप्रस लाईन, नवी खडकी,पुणे येथे एक इसम आपल्या हातामध्ये लोखंडी कोयता सारखे हत्यार घेऊन थांबला आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी वपोनि सुनिल पंधरकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई संदर्भात आदेश दिले.
त्याप्रमाणे वरील स्टाफ च्या मदतीने बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाच्या इसमाला जागीच ताब्यात घेऊन सदर इसमास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव
रेवणनाथ पांडुरंग गोसावी , वय २३ वर्षे, रा.दापोडी, पुणे असे सांगितले त्याच्या कब्जात ४००/- रुपये किंमतीचा एक लोखंडी कोयता मिळून आला.सदर इसमास दरोडा २ कार्यालयात आणून त्याचे विरुध्द विश्रांतवाडी पो स्टे गु र न. १३२ /२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे सो, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उदय काळभोर,दिनकर लोखंडे, विनायक रामाने,मनोज खरपुडे,अमोल सरतापे यांनी केली आहे.
सुनिल पंधरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ,पुणे शहर.
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad