सराईत गुन्हेगारांनी केली शेजाऱ्याच्याच घरात केली चोरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी.
दिनांक २२/०५/२०२२ वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
सराईत गुन्हेगारांनी केली शेजाऱ्याच्याच घरात केली चोरी , चोरीचे पैशातुन खरेदी केली अग्निशस्त्रे , महागडे मोबाईल फिर्यादी यांचे दि . १६/१०/२०२१ रोजी १४,५०,००० / – किंमतीचा सोन्याचे दागीने व रोख रक्कम हा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे रुमचा दरवाजा पुढं ढकलुन आतमध्ये प्रवेश करुन दिवानमध्ये ठेवलेले दोन स्टीलचे डब्बे ज्यामध्ये सोन्याचे दागीने व रोख रक्कम हे चोरुन नेलेने त्या अज्ञात चोरटया विरुध्द तक्रार दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६७/२०२१ भा.द.वि.कलम ३८०,४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे .
दाखल गुन्हयाचा वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख व संतोष नाईक यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , नमुद चोरी करणारे इसम हे त्याच वस्तीत राहतात , त्यावरुन वानवडी पोलीसांनी सापळा रचुन इसम
नामे नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ , वय ३३ वर्षे , रा . तरवडेवस्ती , महंमदवाडी रोड , हडपसर , पुणे
यास सापळा रचुन पकडुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस कस्टडी दरम्यान त्याचेकडे चौकशी करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिलेने त्यास विश्वासात घेवुन अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथिदार
नामे साहील खंडु पेठे , वय -२० वर्षे , रा.तरवडेवस्ती , हडपसर , पुणे
याचे मदतीने केल्याचे निष्पन्न झालेने , त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली , नमुद वरील दोन्ही आरोपीतांनी चोरी केले सोन्याचे दागिने स्विकारणारा इसम
नामे रोहित संजय पंडीत , वय -३७ वर्षे , रा.ग.नं .०५ , ससाणेनगर , हडपसर , पुणे
यास अटक करून त्याचेकडुन एकुण १६० ग्रॅम वजनाचे ६,४०,००० / – रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले असुन , चोरीत मिळालेले रकमेतून आरोपीतांनी विकत घेतले १९ , ००० / – रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा फोन व ५०,००० / – रुपये किंमतीचा आय फोन ११ प्रो – मॅक्स मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन , चोरीपैकी काही रक्कम जुन्या गाड्या दुरुस्त करण्याकरीता वापरलेने ५०,००० / -रु.कि.चे दुचाकी वाहन यामाहा मोटार सायकल क्र .एम . पी .०४ / सी / ६५२१ व ८०,००० / – रु . किची चारचाकी वाहन होन्डा अॅसेन्ट कार क्र . एम . एच . १२ / ए.एक्स / ८२७८ देखिल जप्त करण्यात आली आहेत असा एकुण ०८,३९ , ००० / – रूपये किंमतीचे १६० ग्रॅम सोन्याचे दागीने दोन वाहने व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत . सदरबाबत अधिक तपास चालु आहे . दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे साहिल पेठे याने त्याचा विधीसंघर्षग्रस्त बालक साथिदार याचे मदतीने तो राहत असलेले वस्तीमध्ये दहशत करण्यासाठी याच चोरीचे पैशातुन अग्निशस्त्र विकत घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले , नमुद अग्निशस्त्रांबाबत यापूर्वीच
१ ) वानवडी पोलीस स्टेशन , पुणे शहर गु.र.नं. १२ / २०२२ , भारतीय हत्यार कायदा क . ३ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस अधि . १९९१ चे कलम ३७ ( १ ) सह ( १३५ ) व
२ ) वानवडी पोलीस स्टेशन , पुणे शहर गु.र.नं .८३ / २०२२ भारतीय हत्यार कायदा क .३ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस अधि . १९९१ चे कलम ३७ ( १ ) सह ( १३५ ) प्रमाणे गुन्हे नोंद आहेत त्याबाबत अधिक तपास चालु आहे .
सदरची कामगिरी ही श्री नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग , पुणे शहर , श्रीमती नम्रता • पाटील , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ ०५ पुणे शहर , श्री . राजेंद्र गलांडे , सहा . पोलीस आयुक्त वानवडी विभाग , पुणे शहर , श्री . दिपक लगड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर , संदिप शिवले , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक , जयवंत जाधव , सपोफौ . संतोष तानवडे , पोलीस अंमलदार , अमजद पठाण , संतोष नाईक , विनोद भंडलकर , अतुल गायकवाड , सर्फराज देशमुख , सचिन गवळी , सागर जगदाळे , शिरिष गोसावी , निळकंठ राठोड़ , अमित चिव्हे , गणेश खरात , दिपक भोईर , सिध्देश्वर कसबे व महिला पोलीस अंमलदार राणी खांदवे या विशेष पथकाने केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad