आंदेकर टोळीचा सदस्य तसेच खुनाच्या प्रयत्नातील व मोक्यातील फरारी आरोपी जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मोक्या मधील फरार आरोपीला गुन्हा शाखेने केली अटक.

युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार ची कामगिरी.

दिनांक २४/०५/२०२२ – युनिट १, गुन्हे शाखा , पुणे शहर आंदेकर टोळीचा सदस्य तसेच खुनाच्या प्रयत्नातील व मोक्यातील फरारी आरोपी जेरबंद .

दिनाक २४/०३/२०२२ रोजी सार्थक बिअर शॉपी काळेपडळ भागात जावुन फिर्यादी व त्यांचे पती यांना आंदेकर टोळीचा अक्षय अकोलकर व त्याचे साथीदार यांनी संगनमत करुन हातात कोयते घेवुन हवेत फिरवुन “ मला उसने दिलेले पैसे मागतो का ? मी जेल मध्ये असताना माझ्या घरच्यांना त्रास देतो का ? असे म्हणुन जीवे ठार मारण्याचा उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले होता . २९ त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गुरनं ३०१/२०२२ भादवि कलम ३०७,१०९ १४३ , १४७ , १४८ , १४९ , ५०४,५०६ , १२० ( ब ) , मपोका ३७( १ ) ( ३ ) १३५ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ व मोका अॅक्ट कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) प्रमाणे गुन्हा नोंद आहे .

सदर गुन्हा दाखल झाले पासुन अक्षय अकोलकर फरारी होता . दिनाक २४/०५/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट -१ कार्यालयात हजर असताना , बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , वरील गुन्हयातील मोक्या मधील पाहिजे असलेला आरोपी नामे अक्षय अकोलकर हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी काळात अशोक चौक नाना पेठ येथे एक वाडयात खोली घेवुन एकटा राहत असल्याबाबतची बातमी मिळाली , त्याबाबत .

मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिप भोसले युनिट १ , गुन्हे शाखा यांनी दिलेल्या सुचनेनुसार नमुद पाहिजे आरोपीस बातमी मिळालेच्या ठिकाणी युनिट -१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाडयास चारही बाजुने घेरुन आरोपी राहत असलेल्या खोली मध्ये छापा टाकुन संशयीत आरोपी अक्षय अकोलकर यास सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेवुन , त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यांने आपले नावे अक्षय दशरथ अकोलकर , वय – ३० वर्षे , रा . २८ , नाना पेठ , अशोक चौक , पुणे असे सांगितले त्यास युनिट -१ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन , हडपसर पोलीस ठाणे येथे गुरनं .३०१ / २०२२ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन , त्याच्याकडे सखोल चौकशी करता , त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केलेले आहे .

सदर आरोपी हा आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य असुन त्याच्यावर एक खुन , तीन खुनाचा प्रयत्न , एक खंडणी , दोन जबरी दुखापत , चार तडीपार आदेशाचा भंग अशा प्रकारचे एकुण १३ गुन्हे फरासखाना , खडक , समर्थ , हडपसर या पोलीस स्टेशन येथे दाखल असुन , त्याच्यावर आतापर्यंत तीन वेळा मोका कायदया प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे .

सदर आरोपीस पुढील कारवाईकामी मा . सहाय्यक पोलीस आयुक्त सो हडपसर विभाग पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त श्री . संदिप कर्णिक , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे – १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक , श्री.संदिप भोसले , पोलीस उपनिरीक्षक , संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख , अय्याज दड्डीकर , महेश बामगुडे , तुषार माळवदकर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *