गॅसचा काळाबाजार करणारे आरोपी केले जेरबंद.
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526
WAJID S KHAN
युनिट -३ , गुन्हे शाखा , पुणे शहर
गॅसचा काळाबाजार करणारे आरोपी केले जेरबंद.
दि .२८ / ०५ / २०२१ रोजी पुणे शहर आयुक्तालय येथे कर्तव्यावर हजर असतांना पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा यांना त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत शंकरशेठ रोड , अंबिका झोपडपट्टीमध्ये पत्र्याचे रुममध्ये काही इसम हे सिलबंद गॅस सिलेंडर मधुन नॉबच्या सहाय्याने रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये ३ ते ३.५ किलो गॅस रिफील करुन पुन्हा सिलबंद करुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधपणे गॅस काढुन दुस – या गॅस सिलेंडरमध्ये भरतात . सदर माहितीचे अनुषंगाने आम्ही स्वतः व आमचे स्टाफ व पुरवठा अधिकारी असे नमुद ठिकाणा जवळ जावुन पाहणी केली असता , पत्र्याचे रुममध्ये , शंकरशेट रोड , भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपा जवळ , अंबिका झोपडपट्टी , स्वारगेट , पुणे येथे ०३ इसम हे त्यांचे लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये सिलबंद गॅस सिलेंडर मधुन नॉबच्या सहाय्याने दुस – या रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस रिफील करुन पुन्हा सिलबंद करुन विक्री करीता स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधपणे गॅस काढुन दुस – या गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याने पंचानी , पुरवठा अधिकारी व आम्ही पाहिल्याने आम्ही अचानकपणे १३:०० वा चे सुमारास पोलीस स्टाफ छापा मारुन सदर ठिकाणी असलेले ०३ इसमांना ताब्यात घेतले , व त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १ ) शब्बीरउद्दीन बडेसाहेब अलालखान , वय -३८ वर्षे , रा .५८० , आनंदनगर झोपडपट्टी , मार्केटयार्ड , पुणे २ ) बालाजी सतीश गावलगडदे , वय २३ वर्षे , रा . अंबिका झोपडपट्टी , शेंकरशेट रोड , भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपा जवळ , स्वारगेट , पुणे . ३ ) प्रसाद तानाजी फावडे , वय -२३ वर्षे , रा.अंबिका झोपडपट्टी , शेंकरशेट रोड , भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपा जवळ , स्वारगेट , पुणे . त्याचे कब्जात व घटनास्थळावर खालील वर्णनाचे व किंमतीचे ० ९ मोठे गॅस सिलेंन्डर व २२ लहान गॅस सिलेंडर , रोख रक्कम , दोन वजन काटे , नॉब , रेग्युलेटर , पाना , तयार केलेला स्क्रु डायव्हर , गॅसचे इनव्हाईस बिले इ . असा एकुण ४८,२६० / – रु चा मुद्देमाल मिळून आला . सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शीसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री . श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे श्री.अनिल शेवाळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अमृता चवरे , सहा.पोलीस निरीक्षक , दत्तात्रय काळे , पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार , विल्सन डिसोझा , संतोष क्षिरसागर , रामदास गोणते , सुजित पवार , एकनाथ कंधारे संदीप तळेकर , कल्पेश बनसोडे , सोनम नेवसे , भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526
WAJID S KHAN 9822331526