जबरी चोरीच्या उददेशाने वृध्द महिलेची निघृण हत्या करणारा अटकेत मुंबई शहरा भांडुप पोलीस ठाणे

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

२ ९ / ०५ / २०२१ * जबरी चोरीच्या उददेशाने वृध्द महिलेची निघृण हत्या करणारा अटकेत ” दिनांक १५/०४/२१ रोजी भांडुप पोलीस ठाण्याचे हद्दीत फुगावाला कंम्पाऊड , क्वारी रोड येथे एकटीच राहणारी वृध्द महिला नामे श्रीमती रतनबेन मोहनलाल जैन , वय ७० वर्षे यांचा मृतदेह तिचे राहत्या घरात मिळुन आला होता . सदर महिलेची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी गळा कापुन हत्या करून एकुण रू . ३,५०,000 / – किमतीचे सोन्याचे दागिने यामध्ये गळयातील चैन , दोन बांगडया , कर्णफुले व नाकातील फुली अशा दागिन्यांचा समावेश होता . सदरबाबत मयत महिलेची मुलगी नामे श्रीमती डिंपल कमलेश शहा , वय ४५ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाणे गु.र.क्र १३६/२१ कलम ३०२,३९७,३ ९४,४५२ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदर गुन्हयाची तात्काळ गंभीर दखल घेत मा . पोलीस सह आयुक्त , ( का व सु ) श्री . विश्वास नांगरे पाटील व मा . अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग श्री . संजय दराडे यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन तपास पथकास सुचना दिल्या . मा . पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ७ , मुंबई श्री . प्रशांत कदम यांनी तात्काळ एका विशेष पथकाची नेमणुक करून तपास सुरू केला . बळीत महिला ही सन १९९३ पासुन एकटीच राहत होती . त्या परीसरातील लोकांना लहान मोठी रक्कम व्याजाने देत असत , त्याचबरोबर खाखरा विक्री करत असल्यामुळे त्यांचा अनेक लोकांशी संपर्क होता . त्यामुळे तपासाची व्याप्ती प्रचंढ वाढली . सदर गुन्हयाचा तपास करताना पथकाने बळीत राहत असलेल्या परीसरातील २५० पेक्षा अधिक कुटुंब , तिचे संपर्कातील ५०० पेक्षा अधिक लोक , ३० नातेवाईक , त्याचेकडुन रक्कम घेणारे लोक , घटनास्थळ जवळ पार्कीग मध्ये येणारे २४० वाहन धारक , ९ ८ ज्वेलर्स दुकानदार , १८ आंबे विक्रेते , अभिलेखा वरील २ ९ आरोपी यांच्याकडे कसुन तपास केला . तसेच सदर महिलेच्या खुनाच्या आरोपीताची माहिती देणाऱ्यास रूपये ५१,००० / – चे बक्षिस जाहिर करण्यात आले होते . सध्या संपूर्ण राज्यात व शहरात कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित आहे . सदर कालावधीत सुध्दा तपास पथकाने ४० दिवस अहोरात्र काम करून नमूद गुन्ह्यात कोणताही सुगावा नसताना मानवी कौशल्याचा अचूक वापर करून आरोपी निष्पन्न केला . सदर आरोपी गुन्हा केल्यानंतर सुरवातीस परिसरात राहून स्वत : हुन तपास पथकास वेगवेगळी माहिती देवून दिशाभूल करीत होता . पोलीस पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आपले नाव निष्पन्न होत असल्याचा सुगावा त्यास लागला असता तो मुंबई शहरातून पळून गेला . सदर आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळवून तसेच तांत्रिक विश्लेषण करून त्यास बिजनौर , उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे . सदर आरोपीस पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे कसुन तपास केला असता त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात दिनांक २८/०५/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयात दोन आरोपीना अटक करण्यात आली असून आरोपी क्रमांक ०१ पुरूष वय २४ वर्षे व आरोपी क्रमांक ०२ माहिला वय ३६ वर्षे असे आहेत . सदर गुन्हयात आतापर्यत जबरी चोरी झालेल्या मालमत्ते पैंकी रूपये दोन लाख किमतीच्या दोन बांगडया हस्तंगत करण्यात आलेल्या आहेत.उर्वरित मालमत्ता आरोपीतांकडे अधिक तपास करून हस्तगत करण्यात येत आहे . सदरची यशस्वी कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . हेमंत नगराळे , मा . पोलीस सह आयुक्त , ( का व सु ) श्री . विश्वास नांगरे पाटील , मा . अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग श्री . संजय दराडे , मा.पोलीस उप आयुक्त परि -७ , मुलुंड , मुंबई श्री . प्रशांत कदम , स.पो.आ. श्रीमती प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. शाम शिंदे , पो.नि. नितीन उन्हावणे , पो.नि. गोपाळे , पो.नि.आर्डेकर , सपोनि सुनिल जातक ( कांजुरमार्ग पोलीस ठाणे ) , सपोनि बाबासाहेब दुकळे ( पार्कसाईर्ट पोलीस ठाणे ) , सपोनि सुर्यकांत पारटकर , सपोनि संतोष कांबळे ( मुलुंड पोलीस ठाणे ) , अमित यादव ( पंतनगर पोलीस ठाणे ) , पोउनि उमेश शिंदे , शरद बागल , रविकांत नंदनवार , दिनेश बागुल ( भांडुप पोलिस ठाणे ) , सपोउनि सुर्यकांत मडव , सपोउनि मालवणकर तसेच पोह / सुनिल पवार , नागेश दरेकर , धनराज आव्हाड , दिनेश पाटील , पोना / संदिप लुबाळ , अनिल वाघ , मिनानाथ कासार , नितीन पाटील , सचिन गांजाळे , कैलास कोमलेकर , पोशि आनंद मानकर , सुर्यकांत शेटटी , धिरज गरूड , रोहिदास पवार , प्रकाश गोंधळी , बाळु कोळी , नाथु कचरे , उमाकांत पाटील , लालसिंग राठोड , किरण निकम , रणजीत ठाकुर , संतोष राठोड , प्रविण खरे , निनाद जाधव , सुशांत भामरे यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

WAJID S KHAN

acspolicecrimesquad@gmail.com

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *