Traffice Police

महापालिकेच्या नावाने बोगस ओळखपत्र बनवणारा गजाआड मुंबई लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई


ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

महापालिकेच्या नावाने बोगस ओळखपत्र बनवणारा गजाआड
मुंबई लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

 मुंबई - रेल्वे प्रवासासाठी मुंबई महानगरपालिकेचे बोगस ओळखपत्र बनवून देणाºयाला गजाआड करण्यात आले. सदर कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत बोगस ओळखपत्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य व रोकड जप्त करण्यात आल्याचे तपासी पथकाने सांगितले.
माहितीनुसार, तिसºया लाटेच्या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यांना व गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोख कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथक रेल्वे स्थानकांमध्ये येणाºयांवर लक्ष ठेवून असताना रेल्वे प्रवासासाठी संपर्क साधाण्याचे आवाहन फेसबुकद्वारे करणाºयाची माहिती खबºयाने दिली. त्यानुसार लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावून धनंजय बनसोडे (२८,रा.डोंबिवली,जि.ठाणे) याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 
 या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र.क्र.४०४/२०२१) भादंवि कलम ४२०,४६५,४६७, ४७१ नुसार गुन्हा दाखल करून धनंजय बनसोडे याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, बृहन्मुंबई महानगरपालिका, उप निबंधक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाचे रबरी स्टॅम्प, ओळखपत्रासाठी भरलेले व रिक्त अर्ज, बोगस ओळखपत्र, १ हजार ८०० रुपये असा एकूण ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 सदर कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, हवालदार राजेंद्र पाटील, पोलीस नाईक महेंद्र कर्डिले, पोलीस अंमलदार अजित माने, पोलीस अंमलदार गोरख सुरवसे, महिला पोलीस अंमलदार पाटील आदी पथकाने केली.
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526
WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *