घरफोडी आणि वाहनचोरी करणारे आरोपी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

घरफोडी आणि वाहनचोरी करणारे आरोपी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून जेरबंद.

दिनांक १९/०८/२०२२रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडिल अधिकारी व अंमलदार हे हडपसर वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरी विरोधी पेट्रोलिंग करत असताना
पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मांजरी ( बु) पुणे येथील मोबाईल दूकान ज्यांनी फोडले आहे त्यातील संशयित मुले ही कुंजीरवस्ती येथे मंदिराजवळ बसलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी वपोनि सुनिल पंधरकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई संदर्भात आदेश दिले.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे ची कामगिरी.

त्याप्रमाणे सदर ठिकाणी स्टाफ च्या मदतीने जाऊन बातमीतील वर्णनाच्या इसमांना मोबाईल फोन, मोबाईल ॲक्सेसरीज सह जागीच ताब्यात घेऊन त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी आपली नावे

१) करन गुंडू गावडे २)राज बाळू घाडगे यांचेसह अन्य दोन विधीसंघर्षग्रस्त बालके सर्व रा.मांजरी (बु), पुणे

यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांचे कब्जातून मोबाईल आणि ॲक्सेसरीजचा एकुण ६५,५४५ -/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच त्यांच्याकडे आणखी सखोल तपास केला असता त्यांनी मांजरी परिसरातून ३ दुचाकी चोरल्याचे सांगितले सदर दुचाकीबाबत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत
१)हडपसर गु.र.नं.१०३२/२०२२कीं रु १५,०००/- ची एच.एफ.डिलक्स
२)हडपसर गु.र.नं.१०३४/२०२२ किं.रु.१२,०००/- ची पॅशन प्लस
३)हडपसर गु.र.नं.१०३६/२०२२ किं.रू.५०००/-ची सुझुकी अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ९८४/२०२२ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८० असा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.


नमूद इसमांचे ताब्यातून एकूण तीन वाहनचोरीचे आणि एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघड झाले असून एकूण ९७,५४५/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाई कामी हडपसर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे .


सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी पोलीस अंमलदार राजेश अभंगे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपूडे, सुदेश सपकाळ,शिवाजी जाधव, गणेश लोखंडे आणि चालक ओंबासे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *