Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणारी बंटी -बबली ला गुन्हे शाखा युनिट -२ ने केले अटक .


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

“ घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणारी बंटी – बबली अटक करून 12,73,000/- रुपये किमतीचे तब्बल 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह गुन्हे शाखा युनिट -२ ने केले जेरबंद

सहा .पोलीस आयुक्त सो .गुन्हे -१ श्री गजानन टोम्पे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८/२०२२ मा.वि.कलम ४५४४५७ ३८० या गुन्हयाचे अनुषांगने पो.नि. श्री क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा युनिट -२ यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने युनिट २ प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी म सहा.पो.नि.वैशाली भोसले ,पोलीस अमलदार गजानन सोनुने ,उज्वल मोकाशी, साधणा ताम्हाणे, रेश्मा उकरडे , उत्तम तारु, कादीर शेख, समीर पटेल , नागनाथ राख अशी एक टिम तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरील टिम दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना

स पो नि वैशाली भोसले व टीम मधील पोलीस अंमलदार यांना दाखल गुन्हयातील संशयीत महिला व पुरुष असे दोघे नटराज हॉटेल जवळ स्वारगेट पुणे येथे सार्वजनीक रोडवर उभे आहे . अशी खात्रीशीर बातमी प्राप्त होताच युनिट -२ प्रभारी श्री कांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शना प्रमाणे युनिट -२ कडील टिमने दाखल गुन्हय़ातील संशयीत आरोपीचा शोध घेऊन त्याना शिताफिन पकडुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे

१ ) रेखा राहुल क्षिरसागर वय ३० वर्षे रा . जांभुळकर चौक विठ्ठल मंदिरजवळ , वानवडीगाव पुणे .

२ ) ऋषभ विनोद जाधव रा . स्वामी विवेकानंद नगर , शेवकर वस्ती , बिल्डींग नं . १० , फ्लॅट नं . ३०१ रामटेकडी , पुणे

असे असल्याचे सांगितले त्यांना ताब्यात घेवून दाखल गुन्हयातील घरफोडी चोरीबाबत चौकशी केली असता ते उडवा – उडवीची उत्तर देवु लागल्याने त्यांना यूनिट -२ कार्यालयामध्ये घेवुन पुन्हा कसोशीने तपास करून , त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करून पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांचे कडून एकून १२,७३,००० / – रुपये किमंतीचे तब्बल २५४.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ( करून १०० टक्के ) हस्तगत करण्यात यश आलेले आहे . गुन्हयातील अटक महिला हि फिर्यादी यांचे घरी घरकाम करण्याचा बहाणा करून एक – एक सोन्याचे दागिने चोरी करीत होती . तसेच पुरुष अटक आरोपीचे मदतीने सोन्याचे दागिने गहाण ठेवत असल्याचे तपासत निष्पन्न झाले . आहे .


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहा.पो. आयुक्त , गुन्हे , श्री गजानन डोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा युनिट -२ , पुणे शहर म.सहा . पो . निरी , वैशाली भोसले , विशाल मोहिते , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे , नितीन कांबळे व पोलीस अमलदार उज्वल मोकाशी , उत्तम तारु, गजानन सोनुने , साधणा ताम्हाणे , रेश्मा उकरंडे , कादीर शेख , समिर पटेल , संजय जाधव , निखील जाधव , विजयकुमार पवार , प्रमोद कोकणे , शकर नेवसे , राहुल राजपुरे , मोहसीन शेख , गणेश थोरात , नागनाथ राख यांनी केली आहे .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *