कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात गोळीबार.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात गोळीबार.

पुणे : पुण्या भागात गोळीबार केल्याची घटना घडली आहे .कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट या भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . या गोळीबारात एक तरूण किरकोळ जखमी झाला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , एका तरुणाने दुसऱ्यावर पूर्व वैमनस्यातून छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडली आहे . हे दोघेही एकमेकांना ओळखतात पण पूर्वीच्या वादाचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं आहे . दरम्यान जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .

तौफिक अख्तर शेख ( वय ४५ , रा . भीमपुरा , लष्कर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे . उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . जुल्फीफार शेख नावाच्या व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तौफिक शेख व जुल्फीकार शेख यांचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय आहेत .

मागील काही महिन्यांपासून तौफिक व जुल्फीकार यांच्यात वाद सुरू आहेत . मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रीट परिसरातील एका दुकानाजवळ थांबले होते . त्या वेळी जुल्फीकार तेथे आला आणि त्याने त्याच्याकडील छयाच्या बंदुकीतून तोफिकवर गोळीबार केला .

गोळीबाराच्या या घटनेनंतर फॅशन स्ट्रीट परिसरातील नागरीक व व्यावसायिक यांच्यात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली . या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला . तेव्हा जुल्फिकारने गोळीबार केल्याची माहिती मिळाली . जुल्फीकारला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *