महानगरपालिकेचे पावसाळी चेम्बर्स झाकणे चोरी करणारे आरोपीना केली अटक .

दिनांक – ०३ /०९/ २०२१ येरवडा पोलीस स्टेशन , पुणे शहर पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेजवरील लोखंडी झाकणे चोरी करणारे आरोपीना केली अटक .

दि .२०/०८/२०२१ रोजी कल्याणीनगर परिसरात पुणे महानगरपालिकेने ड्रेनेजवर बसविलेली लोखंडी जाळी असलेले पावसाळी चेम्बर्स झाकणे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले म्हणून येरवडा पोलीस स्टेशन गु र नं ४३०/२१ भादवि ३७९ नुसार गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोशि अनिल शिंदे व पोना अमजद शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सदर गुन्हयातील आरोपी हे आगाखान ब्रिज जवळ कल्याणीनगर येथे एका रिक्षातून चोरी केलेली चेम्बर्सची झाकणे कोठेतरी घेवून जाणार आहेत असे समजल्याने लागलीच तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर , सहा.पोलीस निरीक्षक समीर करपे , पोना अमजद शेख , पोशि अनिल शिंदे , पोहवा दत्ता शिंदे , पोना गणेश वाघ , पोना किरण घुटे , मपोशि वर्षा सावंत यांनी २ इसम व १ महिला यांना पळून जात असताना पकडले . त्यांचे नावे १ ) निलेश विलास पवार वय २२ रा स नं १२ उर्दू शाळेजवळ लक्ष्मीनगर येरवडा पुणे २ ) सुरेश अनिल पाटोळे वय ३१ रा सदर व महिला नामे ३ ) रोमा सुनिल पवार वय ३५ रा सदर असे आहेत . त्यांच्याकडे २ लोखंडी चेम्बर्सची झाकणे मिळून आली असून त्यांनी ती कल्याणीनगर भागातून चोरी केली असल्याचे कबूल केल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडे पोलीस कस्टडीदरम्यान अधिक तपास करता त्यांनी कल्याणीनगर भागात एकूण ६ लोखंडी चेम्बर्सची झाकणे चोरल्याचे कबूल केले आहे . गुन्हयातील चोरीस गेलेली ३६,००० / – रु किंमतीची एकूण ६ लोखंडी चेम्बर्सची झाकणे व चोरी करण्यासाठी वापरलेली ५०,००० / रु किंमतीची एक रिक्षा असा एकूण ८६,००० / – रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .

सदरची कामगिरी पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -४ , श्री पंकज देशमुख , सहा . पोलीस आयुक्त , येरवडा विभाग श्री किशोर जाधव , व.पो.नि येरवडा , श्री.युनुस शेख , पो.नि. गुन्हे , येरवडा श्री . विजयसिंह चौहान , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र आळेकर , सपोनि समीर करपे , पोना अमजद शेख , पोशि अनिल शिंदे , सपोफौ प्रदिप सुर्वे , पोहवा गणपत थिकोळे , पोहवा दत्ता शिंदे , पोना गणेश वाघ , पोना तुषार खराडे , पोना किरण घुटे , पोशि राहुल परदेशी , पोशि अजित वाघुले , पोशि स्वप्नील मराठे , पोशि गणेश शिंदे , मपोशि वर्षा सावंत यांनी केलेली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *