लोणावळा ग्रामीण पोलिसांची सहा हातभट्टयांवर कारवाई, ५ लाखांचे कच्चे रसायन नष्ट.
Acspolice
लोणावळा, दि.3 बेकायदेशीर गावठी दारू भट्टयांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचे कारवाई सत्र सुरूच तीन दिवसांत सहा गावांतील सहा गावठी हातभट्टयांवर कारवाई करत तब्बल ४ लाख ८० हजाराचे कच्चे रसायन केले नष्ट तर ३ हजार रु. किंमतीचा ५० लिटर गावठी दारू साठा जप्त केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.
पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी नुकताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा निरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये गावठी हातभट्टी सुरु असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाल्याने लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली भादवी कलम ३२८, महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५ (ख )(ड )अंतर्गत हद्दीतील करंडोली, औंढे, कुसगाव, शिळींब, काले या सहा गावातील सहा गावठी दारू हातभट्टयांवर कारवाया करण्यात आल्या.
त्यादरम्यान औंढे येथील कारवाईत अक्षय संग्रामसिंग राजपूत ( वय ३१, रा. औंढोली, ता. मावळ, जि. पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी याठिकाणी छापा मारत ७ हजार ४०० लिटर गावठी हातभट्टी दारू असलेले बॅरल नष्ट केले त्या बॅरलमध्ये अशुद्ध पाणी, विविध झाडांच्या मूळ्या, काळा गुळ, नवसागर असे मिश्रण करून गावठी हातभट्टी दारू तयार केली जात होती.
अशा विषारी रसायनापासून तयार केलेल्या दारुमूळे मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना देखील ही विषारी गावठी हातभट्टी दारू तयार करताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनकर हे करत आहेत.