वाहनचोरी मधील पाहीजे असलेला आरोपीस शिताफीने दरोडा व वाहनचोरी पथक २ केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
वाहनचोरी मधील पाहीजे असलेला आरोपीस शिताफीने दरोडा व वाहनचोरी पथक 2 केली अटक.
पुणे दिनांक २८/०८/२०२१ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व पोलीस अंमलदार उदय काळभोर विनायक रामाणे राजेश अभंगे दिनकर लोखंडे दत्तात्रय खरपुडे शिवाजी जाधव सुदेश सपकाळ गणेश लोखंडे अमोल सरतापे असे मुंढवा पोलीस स्टेशन डायरी इन्ट्री नं ११/२०२१ दिनांक ०३/०८/२०२१ अन्वये सीआरपीसी ४१ ( १ ) ( ड ) प्रमाणे मधील दिनांक ०३/०८/२०२१ रोजी ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे
१ ) मारुती माधव गिरी वय २२ वर्षे रा स नं २०३ गणेश मंदीराजवळ साडेसतरानळी हडपसर पुणे
२ ) उमेश भारत चौगुले वय २२ वर्षे रा . ए . एम . कॉलेज मागे साई अमर सोसायटी महादेवनगर मांजरी बुद्रुक हडपसर यांचे कब्जातून चोरीची एकूण १४ दुचाकी वाहने जप्त करणेत आली होती .
सदरची जप्त वाहने त्यांनी त्यांचा साथीदार आरोपी नामे दशरथ परतवाड वय अदाजे २१ ते २२ वर्षे रा अमनोरा लेबर कॅम्प शेजारी मुंढवा पुणे मूळगाव नांदेड याचे मदतीने चोरी केलेचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर पाहीजे आरोपी त्यावेळी मिळून आलेला नसलेने वरील स्टाफचे मदतीने चंदननगर , हडपसर मुंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गोपनीय शोध घेत असताना महागणेश सोसायटी , केशवनगर , मुंढवा , पुणे येथे १७.४५ वा . चे सुमारास आलो असता पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडुन गोपनिय बातमी मिळाली की , वरील नमुद पाहिजे आरोपी दशरथ परतवाड हा आज रोजी मांजरी शुगर फॅक्टरी पुणे समोर येथे मित्रांना भेटण्याकरीता येणार आहे,
अशी बातमी मिळाल्याने सदर माहितीबाबत पथक प्रमुख श्री.सुनिल पंधरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले.त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे कार्यवाही करुन , आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेश व सुचना दिल्याने लागलीच वरील स्टाफ सह जावुन मांजरी शुगर फॅक्टरीचे गेट समोरील टपरीजवळ सदर पाहिजे आरोपी यास अत्यंत शिताफीने पकडले.
त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव व पत्ता दशरथ गणेश परतवाड वय २२ वर्षे रा अॅमनोरा लेबर कॅम्प शेजारी बापू ढाब्याजवळ जाधव वस्ती मुंढवा पुणे मूळगाव मुं पो भगनूरवाडी ता मुखेड जि.नांदेड असे असल्याचे सांगितल्याने त्यास त्याचे विरुध्द दाखल असलेल्या खालील दाखल गुन्ह्यांमध्ये कारवाई करणेचे असल्याने त्यास आमचे कार्यालयात मा . श्री . सुनिल पंधरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे समक्ष हजर केले.
पोलीस स्टेशन हडपसर पो.स्टे . ५१०/२०२१ भादवि कलम ३७९ ,
हडपसर पोलीस स्टेशन ५१४/२०२१ भा.द.वि. कलम ३७९
हडपसर पोलीस स्टेशन ५९९/२०२१ भा.द.वि. कलम ३७९
हडपसर पोलीस स्टेशन ६०२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९
हडपसर पोलीस स्टेशन ५८९/२०२१भा.दं.वि.कलम ३७९,
हडपसर पोलीस स्टेशन ५३७/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९,
लोणीकंद पोलीस स्टेशन ३९७/२०२१ भा.दं.वि.कलम३७९,
सिंहगड रोड पोलीस स्टेशन २५१/२०२१ भा.दं.वि.कलम३७९,
बारामती शहर पोलीस स्टेशन५८५/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९ ,
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन २८७/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९,
टेंभुर्णी पोलीस स्टेशन ५११/२०२१, भा.द.वि.कलम ३७९
वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपी मजकुरचा सहभाग असल्याने त्यास पुढील कारवाई करीता त्याची वैद्यकीय तपासणी करून हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री.श्रीनिवास घाडगे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. लक्ष्मण बोराटे सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुनील पंधरकर आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ मधील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526