इन्कम टॅक्सचे अधिकारी सांगुन त्याचे अपहरण करुन २० लाख रोख रक्कम व ३० तोळे सोने लुटणाया सराईत आरोपी भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात.
ACS POLICE CRIME SQUAD
दिनांक – २९ /०८ /२०२१ भारती विदयापीठ पोलीस स्टेशन ,
इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याची बतावणी करून सोनाराला लुटणारे आरोपी भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात
पुणे शहर सोन्याचे व्यापा – यास इन्कम टॅक्सचे अधिकारी सांगुन त्याचे अपहरण करुन २० लाख रोख रक्कम व ३० तोळे सोने लुटणाया सराईत आरोपीस शिताफीने अटक
दिनांक २६ / ०८ / २०२१ रोजी रात्री २१/३० ते दिनांक २७/०८/२०२१ चे पहाटे ०१/१५ वा . चे दरम्यान फिर्यादीचे रहाते सोसायटी समोरुन ते स्वामी नारायण मंदिरा समोर जाभुळवाडी दरी पुला कडे जाणा – या सर्व्हिस रोडवर , पुणे याठिकाणी एक इसम वय ४१ वर्षे , रा . वेंकटेश क्षितीज सोसायटी , दत्तनगर , पुणे हे त्यांचे मित्र व्यास यादव असे गप्पा मारत असताना एका इनोव्हा गाडीतुन ५ इसमांनी येवुन फिर्यादीस “ आम्ही इनकम टॅक्स अधिकारी आहे . तुम्ही इनकम टॅक्स भरत नाही , तुम्ही बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता , सरकारची फसवणुक करता , तुमच्यावर इनकमटॅक्सची रेड आहे ” असे म्हणुन फिर्यादी व त्यांचे मित्रास जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवुन तेथुन स्वामी नारायण मंदिरा समोरील दरी पुलाकडे जाणारे सर्व्हिस रोडवर नेवुन तेथे फिर्यादीस गाडीत ठेवलेली लांबडी धारदार हत्यारे लावुन दमदाटी करत फिर्यादीचे खिशातील पाकिट त्यातील ११,२०० / – रुपये तसेच पाकिटात असलले फिर्यादीचे आधार कार्ड , पॅनकार्डची झेरॉकस जबरदस्तीने काढुन घेवुन त्यांनतर फिर्यादीस तुझ्या घरात २५ किलो सोने असल्याची आम्हाला माहीती आहे तु आम्हाला ७५ लाख रुपये दे असे म्हणुन हाताने मारहाण करु लागले फिर्यादी यांनी एवढी रक्कम माझेकडे नाही , घरात असलेले सोने ग्राहकांचे आहे असे सांगीतले असता आरोपींनी फिर्यादीस २० लाख रुपये व ३० तोळे सोने तात्काळ घरातुन मागवुन घे नाहीतर तुला खलास करतो अशी धमकी देवुन फिर्यादीचे घरात फिर्यादीचा मित्र व्यास यादव याला पाठवुन फिर्यादीचे घरातुन २० लाख रुपये व ३० तोळे वजनाच्या सोन्याच्या नथ असा ऐवज हत्याराचा धाक दाखवुन जुलमाने काढुन घेवुन पळुन गेले म्हणून त्याच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ५९८ / २०२१ , भादवी कलम ३६३ , ३६४ ( ए ) , ३९५ , ३९४ , ३९७ , ३८७ , ५०६ प्रमाणे नोंद करण्यात आला होता व सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उप निरीक्षक अंकुश कर्चे , भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे यांचेकडे देण्यात आला होता . सदर गुन्हयातील आरोपीचा तपास पथकांची अधिकारी नितीन शिंदे व अंकुश कर्चे तसेच तपास पथकांतील अंमलदार असे आरोपीचा शोध घेत घेत असताना घटना घडतेवेळी फिर्यादी यांचे सोबत असणारा त्यांचा मित्र नामे व्यास गुलाब यादव , वय ३४ वर्षे , रा . साईवॉटर क्रिस्ट सोसायटी , बि . नंबर ए , फलॅट नंबर ६०४ , जांभुळवाडी रोड , मोडक वस्ती , आंबेगाव खुर्द , पुणे मुळ गाव – मु . पो . बिशनपुर , ठाणा – मोफसील , ता . सरसर , जि . सिवान , बिहार हाच गुन्ह्यामध्ये सामील असल्याची पो.उप.नि. कर्चे व पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड यांना माहीती मिळाल्याने व्यास गुलाब यादव यांना चौकशीकामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसुन चौकशी केली असता तो उडवा उडवीची व असमाधानकारक माहीती सांगत असल्याने सशंयावरुन त्याचेकडे सखोल तपास करुन पोलीस खाकी दाखविली असता त्याने त्यांचे इतर सहका यासोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे व त्याचे सांगितले कि , मित्राकडे बरेच सोने व पैसे असल्याचे माहीती असल्याने सुमारे २५ दिवसांपुर्वी मी त्यांना लुटण्याचे ठरवले होते त्यासाठी मी माझा मित्र शाम अच्युत तोरमल रा . तळजाई , पुणे याला मित्राला लुटुन त्याचेकडुन पैसे काढु असे सांगीतले सदर कामासाठी जॉनसन रा . खडकी याचे मध्यस्थीने भैय्यासाहेब मोरे रा . च – होली , किरणकुमार नायर खडकी यांचे सोबत पांचाली हॉटेल , जंगली महाराज येथे ओळख करुन दिली मित्र कोठे राहातो , काय काय करतो , कोठे फिरत याबाबत माहीती दिली पांचाली हॉटेल येथे मिटींग करुन शाम तोरमल , भैय्यासाहेब मोरे त्यांचे सोबत इनोव्हा गाडी व गाडीत ४ ते ५ मुले घेवुन मित्रास इनकमटॅक्स अधिकारी आहे असे सांगुन त्याच्या सोबत गाडीत बसवुन त्याला दम देवुन तुमच्यावर रेडची ऑर्डर आहे , तुमच्याकडे खुप सोन असल्याची आम्हाला माहीती आहे असे सांगुन त्यांनी इनोव्हा गाडीत बसवुन तेथुन स्वामी नारायण मंदिरासमोर दरी पुलाकडे जाणारे सर्व्हिस रोडवर नेले तेथे त्यांनी सर्वांनी नंदकिशोर वर्मा याला हत्यारे काढुन दमदाटी करुन त्याचे पाकिट जबरदस्तीने काढुन घेतले त्यानंतर त्याला दमदाटी करुन ७५ लाख रुपयांची मागणी केली परंतु मित्राकडे ऐवढे पैसे नाहीत असे सांगत असताना
त्यांनी पुन्हा त्याला दमदाटी करुन २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागीने त्याचे घरातुन आणण्यासाठी मला पाठवले व मला त्याचे घराजवळ सोडले मी पैसे आणायला त्याचे घरी गेलो असता त्याचे बायकोने पैसे दिले नाहीत त्यानंतर मित्राचा भात भरत वर्मा याला फोन करुन पैसे व सोने आणायला सांगीतले . भरत वर्मा याने घरातुन २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याच्या नथा घेवुन माझे जवळ आल्यावर आम्ही दोघांनी वर्माला फोन लावुन स्वामी नारायण मंदिरा समोर जावुन त्यांना पैसे व सोने दिले त्यानंतर त्यांनी मित्राला सोडले असता ते निघुन गेले . सदर गुन्हयात आरोपी नामे व्यास गुलाब यादव , शाम अच्युत तोरमल , भैय्यासाहेब मोरे , किरणकुमार नायर व त्यांचे इतर साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयीत आरोपी मैय्यासाहेब मोरे याची माहीती कोल्हापुर परिसरात असल्याचे समजल्याने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांचे परवानगी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व तपाथ पथकांचे पोलीस अंमलदार यांना कोल्हापुर येथे तपासाकामी पाठविले . पो.उप.नि , शिंदे व टीम यांना संशयित आरोपी है मुरगुड पोलीस स्टेशन , कोल्हापुर या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने संशयित आरोपी यांच्या प्राप्त मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण करुन सदर भागात आरोपी यांचा शोध घेत असताना नमुद आरोपी हे देवगड – निपाणी हायवेवर थांबले असल्याचे दिसले . लागलीच पो.उप.नि शिंदे व टीम यांनी सदर ठिकाणी सापळा रचला परंतु त्याची चाहुल आरोपी यांना लागताच ते त्यांचे ताब्यातील इनोव्हा गाडीमधुन पळुन जावु लागले असता पो.उप.नि. शिंदे व टीम यांनी त्यांचेजवळ असलेल्या दुचाकी व चारचाकी यांच्या मदतीने शिताफीने पाठलाग करीत असताना ते इनोव्हा गाडी थांबवित नव्हते त्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड असे इनोव्हा गाडीला लटकले व पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी इनोव्हा गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार केल्याने आरोपींनी त्यांची इनोव्हा गाडी थांबविली व आरोपींनी पो.उप.नि. शिंदे व टीम यांनी ताब्यात घेतले असता इनोव्हा गाडीमध्ये १ ) भैय्यासाहेब विठठल मोरे २ ) किरण कुमार नायर ३ ) मारुती अशोकराव सोळंके ४ ) ऊमेश अरुण ऊबाळे ५ ) अशोक जगन्नाथ सावंत ६ ) सुहास सुरेश थोरात असे एकुण ६ जण मिळुन आले . सदर आरोपींना त्यांनी गुन्हयात वापरलेल्या इनोव्हा गाडी नंबर एमएच .०९ / बी.एम. / ७७७१ सह ताब्यात घेवुन मुरगुड पोलीस स्टेशन येथे आणुन आरोपी मैय्यासाहेब विठठल मोरे याचेकडे तपास केला असता त्यांनी १ ) व्यास गुलाब यादव , वय ३४ वर्षे , रा . साईयोंटर क्रिस्ट सोसायटी , वि . नंबर ए . फलेंट नंबर ६०४ , जांभुळवाडी रोड , मोडक वस्ती , आंबेगाव खुर्द , पुणे मुळ गाव – मु . पो . विशनपुर , ठाणा – मोफसील , ता . सरसर , जि . सिवान , विहार २ ) शाम अच्युत तोरमल , यय ३१ वर्षे रा . पांडुरग निवास , लेन नंबर ४ , सर्वे नंबर ७. राजमुद्रा सोसायटी , धनकवडी , पुणे यांच्या प्लॅनप्रमाणे १ ) किरण कुमार नायर , वय ३१ वर्षे रा . गव्हाने वस्ती , कुमार निवास , नलावडे चाळ , भोसरी २ ) मारुती अशोकराव सोळंके , वय ३० वर्षे रा . फुलेनगर , ता . माजलगाव , जि.विड ६ ) ऊमेश अरुन ऊबाळे , वय २४ वर्षे , रा . गणपती मंदिरा शेजारी , गव्हाने वस्ती , भोसरी ३ ) अशोक जगन्नाथ सावंत , वय ३१ वर्षे , रा . शिवाजीनगर , बजाज पेट्रोल पंपा शेजारी , माजलगाव , बीड ४ ) सुहास सुरेश थोरात , वय ३२ वर्षे रा . आकुर्डी , दत्तवाडी , पुणे मुळ गाव कारवे . ता . कराड , जि . सातारा ५ ) रोहीत संभाजी पाटील , वय २३ वर्षे रा.सध्या- फ्लॅट नं . ५०२ , सी विंग , रिध्दी सिध्दी टॉवर्स , चहोली फाट्याजवळ , चहोली , पुणे . मुळ पत्ता . मु . पो . सरवडे , ता . राधानगरी जि . कोल्हापुर यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने व गुन्ह्यातील लुटलेला मुद्देमाल हा पुण्यामध्ये असणाया रोहीत संभाजी पाटील , वय २३ वर्षे रा.सध्या- फ्लॅट नं . ५०२ , सी विंग , रिध्दी सिध्दी टॉवर्स , चहोली फाट्याजवळ , चहोली , पुणे याचेकडे असल्याची माहीती दिली . लागलीच पो.उप.नि. शिंदे यांनी सदरची माहीती पो.उप.नि. कर्वे यांना कळविली असता पो.उप.नि. कर्चे व टीम यांनी रोहीत संभाजी पाटील यास चहोली , आळंदी रोड , पुणे येथुन ताब्यात त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांने मुद्देमाल एका ठिकाणी लपवुन ठेवल्याची माहीती दिली . त्यामुळे पो.उप.नि. कर्ये व टीम यांनी सदरचा मुद्देमाल हा आरोपीच्या ताब्यातुन जप्त करुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.तसेच त्याचेकडून १९ .७८,५०० / – रोख रक्कम , १५,००,००० / – त्यात सोन्याच्या विविध ग्रॅम वजनाच्या नाकातील नथा सर्व मिळुन वजन ३० तोळेव १२,००,००० / – इनोव्हा गाडी नबर एमएच ०९ / बी . एम / ७७७१ , व आरोपीतांचे मोबाईल फोन असे एकुण ३३.२८.५०० / – रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे . तसेच कोल्हापुर येथुन ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ताब्यातील आरोपीपैकी मारुती अशोकराव सोळंके , वय ३० वर्षे रा . फुलेनगर , ता . माजलगाव , जि.बीड व अशोक जगन्नाथ सावंत . वय ३१ वर्षे , रा . शिवाजीनगर , बजाज पेट्रोल पंपा शेजारी , माजलगाव , बीड हे माजलगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६ / २०२१ , भा.दं.वि. कलम ३०२,३४ मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , डॉ . राजेंद्र डहाळे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२. पुणे शहर श्री सागर पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री जगन्नाथ कळसकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्रीमती संगिता यादव , पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे , अंकुश कर्चे पोलीस उप निरीक्षक अंकुश कचे , अमलदार रविन्द्र भोसले , रविंद्र चिप्पा , गणेश सुतार , सचिन पवार , निलेश खोमणे , योगेश सुळ , हर्षल शिंदे , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , धनाजी धोत्रे , नवनाथ खताळ , सचिन गाडे , आशिष गायकवाड , विक्रम सावंत , जगदीश खेडकर व शिवदत्त गायकवाड , विजय कुंभारकर व मंगेश बोरडे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526