मोक्क्याचे गुन्हयांत ८ माहिन्यापासुन फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट -३ कडुन जेरबंद.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ACS POLICE CRIME SQUAD
दि .१४ / ०८ / २०२१ . पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली हत्यारबंद टोळीला व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील मोक्क्याचे गुन्हयांत ८ माहिन्यापासुन फरार असलेला आरोपी युनिट -३ कडुन जेरबंद …
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
दि .१३ / ०८ / २०२१ रोजी पुणे शहर आयुक्तालय येथे मा.पोलीस आयुक्त साो , मा.सहा आयुक्त सो.यांचे आदेशान्वये पुणे शहरात कोबींग ऑपरेशन दरम्यान पोहवा क्षिरसागर व पोहवा मारणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हद्दीत असणारे हॉटेल ग्रीन फिल्डचे समोर रोडच्या पलीकडे असलेले शेल सिलेक्ट पेट्रोल पंपावर दरोडा टाकणेचे तयारीत असलेली टोळीबाबत मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने मा.श्री.अभय महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनखाली युनिट -३ कडील स्टाफने बातमीप्रमाणे पेट्रोलपंपाचे थोडे अलीकडे थांबुन पाहणी केली असता , ०५ इसम हे आपसांत काही तरी बोलत असल्याचे दिसुन आल्याने व त्यातील एकजण म्हणाला की “ भी मॅनेजरला रिव्हॉल्वरचा धाक दाखवेण , त्यांनतर मी इशारा केल्यावर तुम्ही पेट्रोलपंपावरील सर्व रोकड ताव्यात घ्या ” असे बोलणे ऐकल्याने , आमची खात्री झाल्याने तात्काळ सदर इसमांना ताब्यात घेतले , व त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ते
१ ) किरण शिवाजी खवळे , वय -२२ वर्षे , रा.रुम नं ११६ , वि.नं .४ , भिमाई हाऊसिंग सोसा निगडी पुणे ( मोक्का फरार आरोपी )
२ ) विल्यम्स जॉन पिटर , वय -२२ वर्षे , रा . भैरवनाथ मंदीरामागे किरकिटवाडी ता.हवेली जि.पुणे
३ ) वैभव राजु खिरीट वय -२४ वर्षे , रा . भैरवनाथ मंदीराशेजारी गो – हे बुं // पुणे
४ ) आकाश गोपीनाथ मते वय २३ वर्षे रा.सी / ३ बि.वृदावन गार्डन कोल्हेवाडी पुणे
तसेच अंधाराचा फायदा घेवुन एक इसम पळुन गेला त्यांचे कब्जात व घटनास्थळावर ०३ गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर , ०५ जिंवत काडतुसे , ०३ दुचाकी , ०४ मोबाईल हँडसेट , ०१ इंटनेट राऊटर , ०१ नाईलॉनची दोरी व ७६०० / -ची रोख रक्कम असा एकुण ३,०७,६५० / – रु चा मुद्देमाल मिळून आला .
सदरची कारवाई मा.श्री.अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे , मा.श्री . श्रीनिवास घाडगे , पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे , मा . श्री.सुरेद्र देशमुख , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे -१ पुणे , यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे श्री . अभय महाजन , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अमृता चवरे सहा.पोलीस निरीक्षक , दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक , अंमलदार संतोष क्षिरसागर राजेद्र मारणे , महेश निवाळकर विल्सन डिसोझा.दिपक क्षिरसागर , प्रकाश कट्टे , कल्पेश बनसोडे , सुजित पवार , सोनम नेवसे , भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे .

ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
वरिष्ठ पोलीस निरीक्षक , युनिट -३ . गुन्हे शाखा पुणे शहर .