तपासपथकाचे अंमलदार सुमित खुट्टे यांची पुन्हा एकदा धडक कामगिरी सराईत चोरटा सुलतान शेख यास समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD

तपासपथकाचे अंमलदार सुमित खुट्टे यांची पुन्हा एकदा धडक कामगिटी सराईत चोरटा सुलतान शेख यास समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक
दिनांक – १७/०८/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर सराईत चोरटा सुलतान शेख यास समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक दोन वाहन चोरीचे व ०४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघड
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
दि . १५/०८/२०२१ रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना त्यांचे बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , नाना पेठ आझाद आळी मध्ये एक पांढ – या रंगाचा फुल बाहयाचा टी – शर्ट व निळ्या रंगाची त्यावर पांढ – या रंगाच्या लाईन असलेली डिझाईन असलेली पँट घातलेला इसम मोबाईलची विक्री करणे करिता येणार असल्याची बातमी मिळाली . सदरची बातमी वरिष्ठांना कळवून कायदेशीर कारवाई करणेचे आदेश मिळाल्याने आझाद अळी येथे सदरच्या कामगिरीसाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून बातमी प्रमाणे खात्री करून पोलीस अंमलदार जितेंद्र पवार व धिरज शिंदे यांनी बातमीतील वर्णनाच्या इसमास ताब्यात घेतले . त्यास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने आपले (नाव सुलतान रिजवान शेख वय १९ वर्ष रा . लक्ष्मीनगर , जामा मज्जिद जवळ , राकेश जनरल स्टोअर्स जवळ , गल्ली नं . १२ , येरवडा पुणे) असे असल्याचे सांगितले . त्याचे जवळील मोबाईल बाबत चिवारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास अधिक चौकशी कामी मर्थ पोलीस स्टेशन येथे आणले . त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता ,
सदरचा मोबाईल त्याने नाना पेठ येथुन चोरल्याचे सांगितले . सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळुन पाहिला असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . तसेच त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने साधारण दिड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून हिरो होंडा पेंशन प्लस ही गाडी चोरले बाबत सांगीतले . सदरबाबत फरासखाना पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळुन पाहिला असता फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३७/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . तसेच त्याने दोन दिवसापूर्वी बोत्रेआळी , सासवड , ता . पुरंदर जि . पुणे येथून पार्कीग मधून होंडा डिओ ही गाडी चोरले बाबत सांगीतले . सदरबाबत सासवड पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळुन पाहिला असता सासवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३१२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . तसेच सदर आरोपीने दोन दिवसापूर्वी नायडू हॉस्पीटल जवळ एक मोबाईल चोरी केलेबाबत सांगीतले . आरोपीकडे एकंदरीत आणखी तीन मोबाईल मिळून आलेने सदरच्या मोबाईल मालकांचे शोध घेण्याचे काम चालू आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
सदरची कामगिरी ही मा.डॉ.संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा.श्रीमती प्रियंका नारनवरे पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -१ , पुणे शहर , मा.सतिश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे , श्री.विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार जितेंद्र पवार , धिरज शिंदे , सुमित खुट्टे , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुभाष मोरे , निलेश साबळे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , यांनी केली आहे .
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526