सामाजिक सुरक्षा विभाग यांचे कडुन जुगार अड्डयावर छापा .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कात्रज येथे पत्र्याचे शेड मध्ये बिनधास्तपणे चालणाऱ्या जुगार-मटका क्लबवर सामाजिक सुरक्षा विभाग चा छापा.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू होता मटका,जुगार ;

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS) प्रतिनिधी,

मा.वरिष्ठांकडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की , कात्रज दत्तनगर सर्व्हिसरोड , आनंद दरबार ट्रस्ट समोर कात्रज पुणे येथे पत्र्याचे शेड मध्ये बेकायदेशीर मटका जुगार धंदा चालु आहे .

पुण्यातील कात्रज दत्तनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बिनधास्तपणे चालणाऱ्या पत्याच्या क्लबवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून कारवाई केली आहे. १६ फेब्रुवारी कात्रज दत्तनगर सर्व्हिसरोड, आनंद दरबार ट्रस्ट समोर कात्रज येथे पत्र्याचे शेड मध्ये बेकायदेशीर मटका जुगार धंदा चालु असल्याची माहिती मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता कल्याण मटका जुगार व पंती पाकोळी सोरट जुगार घेत असताना व जुगार खेळत असताना १० जण मिळुन आले.

त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख रूपये २५ हजार आणि जुगाराचे साहित्य मिळुन आले आहे. १० जणांन विरूध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० जणांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,गुन्हे यांचे आदेशप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके,

सदरची कारवाई मा . पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह – आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त पोकळे गुन्हे शाखा , पुणे , मा . पोलीस उप – आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , यांचे आदेशप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने , पोउपनि श्रीधर खडके , पोलीस अमंलदार , बाबा कर्पे , प्रमोद मोहिते , इरफान पठाण , हणमंत कांबळे , पुष्पेंद्र चव्हाण , प्रफुल्ल गायकवाड यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *