जुने रेकॉर्ड वर असलेला आरोपीला दरोडा पथक २ गुन्हे शाखा ची कारवाई.

जुने रेकॉर्ड वर असलेला आरोपीला दरोडा पथक २ गुन्हे शाखा ची कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
आज रोजी दरोडा व वाहन चोरी पथक २ कडील पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाने, सुदेश सपकाळ,मनोज खरपुडे ,शिवाजी जाधव हे पोलीस पथक हद्दीत गस्त करत असताना पो ना ६४६९ शिवाजी जाधव आणि पो ना ५५ मनोज खरपुडे यांना त्यांच्या बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सोहेल जावेद शेख , वय २० वर्षे, रा. हडपसर पुणे यांच्याकडे चोरीच्या दुचाकी असून तो रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया मेन गेट कडून सय्यद नगर कडे जाणाऱ्या रोडवर काळ्या व निळ्या रंगाची हीरो होंडा पॅशन गाडीवर कोणाची तरी वाट बघत थांबलेला आहे. सदरची माहिती श्री सुनील पंधरकर, पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने बातमीच्या ठिकाणी जाऊन वरील स्टाफ चे मदतीने त्यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे गाडी बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला सदरची गाडी चेक केले असता वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं ३६१/२०२१ गुन्हा दाखल होता दुचाकी मिळून आल्याने त्यास सी आर पी सी ४१(१)(ड) अन्वये ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या. दुचाकी बाबत अधिक तपास करता आणखीन दोन दुचाकी चोरल्याची माहिती आरोपीने दिली१) मुंढवा पो स्टे पुणे गु र क्रं २७६/२०१९ भा द वी कलम ३७९ व २) चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय गु र क्रं ५१७/२०१९ भा द वी कलम ३७९ हे दोन गुन्हे आरोपीकडून उघड झाले असून एकूण २८००० /- रू किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आरोपीस वानवडी पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुनील पंधरकर पोलीस निरीक्षक.

दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा, , पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *