वकील महिलेला खंडणी मागणारे सराईत गुन्हेगार युनिट १ गुन्हे शाखाची कामगिरी .
दिनांक १६/१०/२०२१ युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर
वकिल महिलेला खंडणी मागणारे सराईत गुन्हेगार , जेरबंद .
युनिट १ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार ची कामगिरी.
दि . १४/१०/२०२१ रोजी एक महिला तक्रारदार या त्यांच्या दुचाकीवर अशियाना अर्पाटमेंट पुना कॉलेजसमोर भवानी पेठ पुणे येथे त्यांच्या मालकीचे असलेल्या झेरॉक्स दुकानामध्ये कोर्टाचे कामाचे प्रती काढण्यासाठी जात असतात सदर सोसायटी बाहेर पार्किंग आहे . सदर पार्किंगमध्ये तक्रारदार महिला दुचाकी लावुन झेरॉक्स काढुन परत आल्या असता सनी म्हेत्रे नावाच्या इसमाने गाडी पार्किंग करण्याचे पैसे मागितले त्यावेळी आमचे स्वतःचे झेरॉक्सचे दुकान आहे मी दिवसातुन ३ ते ४ वेळा दुकानात येते मी हे रोज कोण कोणला सांगु असे म्हणुन जात असताना बॅरेकेट लावुन तक्रारदार महिलेची गाडी अडवुन ” तेरी कोणसी दुकान है मुझे बता , हमको पैसे दो नही तो तुम्हारी दुकान फोड दुंगा , नही तो तुमको भी नही छोडुंगा ” म्हणुन आरोपी सनी म्हेत्रे , सागर बग्गन व त्यांचे इतर दोन साथीदार यांचेवर लष्कर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १३२ / २०२१ भादवि कलम ३८५ , ३४१ , २८३ , २९० , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .
दि . १६/१०/२०२१ रोजी युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट -१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत पाहिजे असलेले आरोपी नामे सनी म्हेत्रे व सागर बग्गन हा पुना कॉलेज गेट समोर भवानी पेठ पुणे येथे येणार आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन परवानगीने युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपींना ताब्यात घेवुन नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) सनी ऊर्फ दशरथ श्याम म्हेत्रे वय ३२ वर्षे रा . ४०४ भवानी पेठ पुणे
२ ) सागर राजु बग्गन वय ३३ वर्षे रा . नक्षत्र बंगालो खंडोबामाळ मोझे वस्ती लोहगाव पुणे असे असल्याचे सांगितले . त्यांचेकडे लष्कर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी लष्कर पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदर आरोपीवर अंमली पदार्थ तस्करी , जबरी चोरी , मारामारी असे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे- १/२ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदशनाखाली युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , महेश बामगुडे , तुषार माळवदकर यांनी केली आहे .
. वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526