सपोनि विशाल वायकर यांच्या सतर्कतेमुळे दारू तस्करीचा पर्दाफाश तिघांना अटक,दारू जप्त

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

सपोनि विशाल वायकर यांच्या सतर्कतेमुळे दारू तस्करीचा पर्दाफाश
तिघांना अटक, फॉरच्युनर कारसह दारू जप्त

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

सातारा – कोरोना संकट काळात लोणंद पोलीस ठाण्यात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सतर्क असलेल्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यामुळे आलीशान गाडीतून सुरू असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश झाला. या कारवाईत ३ जणांना अटक करण्यात आली असून ३० देशी दारूचे बॉक्स, १ बिअरचा बॉक्स व १५ लाख रुपयांची फॉरच्युनर कार जप्त करण्यात आली आहे.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, तिसºया लाटेचे सावट असल्यामुळे शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊ नमध्ये नियमावलींचे पालन करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांचे पथक हद्दीत चोख कर्तव्य बाजवत आहेत. येणाºया जाणाºया प्रत्येकावर लक्ष ठेवून असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना दारू तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून आलीशान फॉरच्युनर कार अडवली. सदर कारची झडती घेतली असता त्यात ९३ हजार ४८० रुपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून धीरज बर्गे, मयुरेश शिंदे, योगेश ऊ र्फ बाबासाहेब बर्गे यांना अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष नाळे, अमोल अडसुळ, महेंद्र सपकाळ, अभिजीत घनवट, फैय्याज शेख आदी पथकाने केली.

CHIEF EDITOR WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *