९ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मेल, एक्सप्रेसमधील प्रवाशांचे दागिने पळवणारा चोरटा गजाआड
९ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त
मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

ONLINE PORTAL NEWS 9822331526

मुंबई – मेल, एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा उघडून मुद्देमाल पळवणाऱ्या सराईत चोराला गजाआड करण्यात मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईमुळे कल्याण व पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली असून ९ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मेल, एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅगांमधून सोन्याचे दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी लोहमार्ग पोलिसांना व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गु. र. क्र. ४२२/२०२१ भादंवि कलम ३७९, ३४ ) गुन्ह्याचा तपास लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे पथक समांतररीत्या करू लागले. तपासादरम्यान लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीचे काळजीपूर्वक विश्लेषण केले. तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तपासी पथकाने सापळा लावून जगदिशचंदर ऊर्फ चरणदास (४२, रा. हरियाणा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने १२ जून २०२१ रोजी तिरुवेलवेली-दादर या एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला बॅगा उतरवण्यास मदत करण्याचा बहाणा करून बदलापूर-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान बॅगेतून सोन्याचा ऐवज व ८ हजार रुपयांची रोकड पळवल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत असताना लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या चौकशीत पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचीही उकल झाली. या गुन्ह्याच्या तपासात दोन्ही गुन्ह्यांतील ९ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस दलाचे आयुक्त कैसर खालिद, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त प्रदीप चव्हाण, लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, पोलीस अंमलदार महेश सुर्वे, अशोक गोसावी, शौकत मुजावर, अतुल साळवी, रवींद्र दरेकर, स्मिता वसावे, अमित बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, लक्ष्मण वळकुंडे, सतीश धायगुडे, महेश काळे, मयूर भोय्ये, सतीश फडके, प्रमोद दिघे, मयूर साळुंखे, सत्यजीत कांबळे, अक्षय चव्हाण, सुनील माघाडे व कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण व पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी केली.

ONLINE PORTAL NEWS

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *