बुलडाणा सायबर पोलीसांनी 100 मोबाईलचा लावला शोध मुळ मालकास मालमत्ता परत करण्याचा सायबर पोलीसांचा अभिनव उपक्रम

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

( बुलडाणा ) दिनांक २८/०६/२०२१ बुलडाणा सायबर पोलीसांनी 100 मोबाईलचा लावला शोध मुळ मालकास मालमत्ता परत करण्याचा सायबर पोलीसांचा अभिनव उपक्रम( बुलडाणा )

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हरविलेले , गहाळ झालेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्याचे मा . श्री अरविंद चावरिया , पोलीस अधिक्षक , बुलडाणा यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर बाबीची गंभीरतेने दखल घेऊन पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा यांना सायबर पोलीस स्टेशन मार्फतीने पोलीस घटकात हरविलेल्या , गहाळ झालेल्या मोबाईल संबंधीची माहिती प्राप्त करुन दैनंदिन कामांसोबतच मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पारित केले . त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांनी सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाचे मदतीने सायबरकडे प्राप्ता झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली .

सायबर पोलीसांकडुन हस्तगत केलेले मोबाईल संबंधीत मुळ मालकास परत करण्याचे उदात्ता हेतुने आज रोजी प्रभा हॉल , पोलीस मुख्यालय , बुलडाणा येथे कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर मा . जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या मार्गदर्शक सुचना व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेवुन मोबाईल वाटप व सायबर जनजागृती संबंधाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन मोबाईल संबंधीतांना सुपुर्द करण्यात आलेले आहेत .

हरविलेले , गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध मा . श्री अरविंद चावरिया , पोलीस अधिक्षक , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री बजरंग बनसोडे , अपर पोलीस अधिक्षक , बुलडाणा , श्री हेमराजसिंह राजपुत , अपर पोलीस अधिक्षक , खामगाव , आणि श्री प्रदिप ठाकुर , पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने विलासकुमार सानप , सहाय्यक पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे , राजु आडवे , कैलास ठोंबरे , पवन मखमले , नंदविशोर आंधळे , योगेश सरोदे , अमोल तरमळे , उषा वाघ यांच्या पथकाने मोबाईलचा शोध घेवुन माहे मे 2021 अखेर 100 हरविलेले , गहाळ झालेले मोबाईल विविध ठिकाणांहुन एकत्र करण्याची तसेच ते मुळ मालकास परत करण्याची महत्वपुर्ण कामगिरी केली आहे . नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरविलेल्यास , गहाळ झाल्यास किंवा चोरीस गेल्यास निसंकोचपणे संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रारी नोंदविण्याचे आवाहन मा . श्री अरविंद चावरिया , पोलीस अधिक्षक , बुलडाणा यांचेकडुन करण्यात आले आहे . प्रदिप ठाकुर पोलीस निरीक्षक , सायबर पोलीसस्टेशन बुलडाणा

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *