Traffice Police

वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद :पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाई


ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद : पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाई

WAJID S KHAN 9822331526
दिनांक ०६/०६/२०२१ रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकचे पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, त्यास दोन ‌इसमांनी जुगाडाच्या दोन गाड्या विकायच्या आहेत कोणी विकत घेत असेल तर सांग असे बातमीदाराकडून खात्री करून कळविले.त्यावरून सासवड रोड काळेपडळ येथे‌ स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर ईसमांना पकडले व त्यांना दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक कार्यालयात चौकशी कामी आणले असता त्यांनी सदर दुचाक्या चोरल्याचे कबूल केले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) प्रशांत मधुकर भोसले २)हसन इक्बाल शेख ३) अभिषेक विलास पाडुळे अशी असल्याचे सांगितले.त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी व त्याचा साथीदार नामें आकाश यांचे सोबतीने वाहनचोरीचे तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले आहेत.
वरील आरोपींकडून खालील प्रमाणे वाहनचोरीचे ५ आणि मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०६/२०२१ भादंवि क.३७९
२) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४१५/२०२१ भादंवि क.३७९ .
३) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.४३९/२०२१ भादंवि क.३७९ प्रमाणे दाखल आहे.
४) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१०८९/२०२१ भादंवि क.३७९ प्रमाणे दाखल आहे.
६) लोणी काळभोरपोलीस स्टेशन गु.र.नं. ३०४/२०२१ भादंवि क.३८०,३४
६) अंबोली (मुंबई)पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५२/२०२० भा.दं.वि.कलम ३७९
७) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.३०७/२०२१ भा.दं.वि.कलम ३९२,३४
असा एकूण १,८७,००० जु.वा.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच सदर आरोपींकडून आणखी इतर ६४,०००‌ जु.वा. किंमतीचे ८ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले असून त्याबाबत तपास चालू आहे
🚓 सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अशोक मोराळे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, मा.श्री. लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२, मा.श्री.सुनिल पंधरकर, पोलीस निरीक्षक, वाहनचोरी विरोधी पथक २ यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
सपोनि विवेक पाडवी,पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार. बुवा कांबळे,उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, संभाजी गंगावणे
या पथकाने केली आहे.

सुनिल पंधरकर. )
पोलीस निरीक्षक,
दरोडा आणि वाहनचोरी
विरोधी पथक
गुन्हे शाखा, पुणे शहर.पोलीस निरीक्षक,

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

(


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *