सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन दहशत पसविणा पुणे शहर युनिट -१ , गुन्हे शाखा , यांचेकडून जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

दिनांक- ०७/०६/२०२१ सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन दहशत पसविणा – या बापु नायर टोळीतील म्होरक्यास युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद दिनाक १५/०५/२०२१ रोजी सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे माधव वाघाटे यांचा बिबवेवाडी येथे खुन झाला होता सदर गुन्हेगारांची मयत बॉडी ही त्याचे राहते घर हेरंब अपार्टमेंट बालाजीनगर पुणे येथे ससुन हॉस्पीटल मधुन आणलेनंतर पुढील अंत्यविधी करीता कात्रज स्मशानभुमी येथे दुपारी ०१.०० वा सुमारास अॅम्ब्युल्नस मधुन घेवुन जात असताना अॅम्ब्युलन्सचे मागे किमान १०० ते १२५ दुचाकी वाहनावर डबल सिट , ट्रिपल सिट इसम बसुन पुणे शहर आयुक्तालयांचा कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी जमाव करण्यास , सभा घेण्यास , व मिरवणुक काढण्यास बंदी असल्याबाबत आदेश असताना अंत्यविधीची परवानगी न घेता सदर आदेशाचा भंग करुन कैलास माने , सिध्दार्थ पलंगे , कुणाल चव्हाण , सुनिल खाटपे , अमित खाटपे , रामा उमाप यांनी नेतृत्व करुन बालाजीनगर ते कात्रज स्मशानभुमी दरम्यान रॅली काढुन दहशत निर्माण केली होती . त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि १२६/२०२१ भादवि कलम १४३ , ३०८,३३२ , २६८,२६ ९ , २७० , १८८ , १५८ , १२० ( ब ) , मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५ , क्रीमीनल लों ॲमेन्टमेंट अॅक्ट कलम ७ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) , साथ रोग अधिनियम १८८७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद आहे . त्यापैकी नेतृत्व करणारे काही आरोपी अटक करण्यात आले होते त्यातील कैलास माने हा सदर गुन्हा झाले पासुन फरार होता . दिनाक – ०७/०६/२०२१ रोजी पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , वरील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे आरोपी कैलास माने हा बारामती येथे असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्या बाबत मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव युनिट -१ , गुन्हे शाखा यांना कळविण्यात आले . त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार व मार्गदर्शनान्वये बारामती येथे जावुन खात्री करीत असताना सदर इसम ही कैकाड गल्ली भिगवण चौक येथे मिळुन आल्याने त्यास १०.०० वा . ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव कैलास महोदव माने वय ३० वर्षे रा . गुलमोहर अर्पा बालाजीनगर पुणे सध्या कैकाड गल्ली भिगवण चौक बारामती असे सांगितले . त्यांस युनिट – १ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन वरील दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केलेले आहे . सदर आरोपी हा बापु नायर टोळीचा सदस्य असुन त्याच्यावर १ खुनाचा , खुनाचा प्रयत्न , मारामारी अशा प्रकारचे एकुण ०६ गुन्हे दाखल असुन त्याच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती . सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त , मा.श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे . श्री श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशना खाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव , पोलीस उप – निरीक्षक सुनिल कुलकर्णी , संजय गायकवाड पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख , तुषार माळवदकर , आय्याज दड्डीकर व महेश बामगुडे यांनी केली आहे .

CHIFE EDITOR WAJID S KHAN

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *