पुणे शहर पोलीस युनिट-६ची कारवाई शहर खानावळीच्या ( मेसच्या ) आडून घरफोड्या करणा – केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

शहर खानावळीच्या ( मेसच्या ) आडून घरफोड्या करणा – या आचा – यास केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत नव्याने समाविष्ट झालेल्या लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचा भौगोलीक परीसर पाहाता या दोन पोलीस स्टेशन हद्दीसाठी स्वतंत्रपणे नव्याने स्थापन झालेल्या गुन्हे शाखा युनिट ६ कडुन मे महिनाच्या कालावधीत आरोपींना अटक करून त्यांचेकडून एकुण २० गुन्हे उघडकीस आणले आहेत . युनिट ६ चे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वाहनचोरी , घरफोडी चे अनुषंगाने अधिक तपास करत असताना हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४१२/२०२१ भा.द.वि.क ३९२ हा गुन्हा एका आचा – याने केला असल्याची खात्रीशीर माहिती पो.ना. नितीन मुंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली . सदरची माहिती श्री गणेश माने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ यांना कळवून त्यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे यांनी विकासनगर वानवडी भागात सापळा रचून शिताफीने संशयीत इसम नामे आकाश अशोक उमाप रा . वानवडी पुणे यास ताब्यात घेतले . त्यास सदर गुन्ह्यामध्ये दि . ०५/०६/२०२१ रोजी अटक करुन मा.न्यायालयाने त्यास दि .०८ / ०६ / २०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे . त्याचेकडे चौकशी करता “ मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरवण्याचे काम देखील करतो . तुम्हाला माझे बाबत मिळालेली माहिती चुकिची आहे . ” असा आव आणून खोटे बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण पोलीसांनी कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व हडपसर मधील साथिदारांसह यापुर्वी पुणे शहरामधे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे . आकाश उमाप हा वानवडी परिसरात एका मेसच्या ठिकाणी जेवण बनवण्याचे व डबे पोहोचवण्याचे काम करत असून कामाच्या आडून पुण्यातील विविध परीसरात बंदघरांची रेकी करत आपल्या साथिदारांसोबत घरफोडी चोरी , वाहन चोरी , जबरी चोरी असा नित्यक्रम त्याने चालू ठेवला . आचारीपणाचा आव घेऊन परत मेस मधे काम करून आपण काहिच करत नाही या अविर्भावात वावरत असे . त्याची सखोल चौकशी करत असताना त्याने सदरचे गुन्हे हे त्याने रेकॉर्ड वरील आरोपी नामे जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु , सोमनाथ ऊर्फ सोम्या गारूळे दोघे राहणार बिराजदार नगर हडपसर यांचे सोबत केल्याचे सांगितले आहे . आकाश उमाप याचेकडे चौकशी करता त्याने पुणे शहरामधे १३ घरफोडी , १ वाहनचोरी , १ जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे . त्याचे ताब्यातून चोरी केलेले ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने , एक किलो चांदीचे वस्तु व दागिणे , दोन दुचाकी , दोन टिव्ही व रु ४६,००० रोख असा एकूण रु . ६,७०,००० / – चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.लक्ष्मण बोराटे गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.गणेश माने गुन्हे शाखा युनिट ६ यांना कळवून त्यांचे सुचनांप्रमाणे सहा पो.निरी , नरेंद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , शेखर काटे , नितीन धाडगे , सचिन पवार , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश टिळेकर व सुहास तांबेकर यांनी केली आहे .

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *