कोंढवा पोलीस ठाण्याचे कामगिरी पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, मोहन मिसाळ यांची उत्तम कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, मोहन मिसाळ यांची उत्तम कामगिरी
चॅटिंग अ‍ॅपद्वारे तरुणाला मारहाण करून लुटणारे जेरबंद

 पुणे : चॅटिंग अ‍ॅपद्वारे तरुणाची ओळख वाढवून लुटणाºया तिघांना जेरबंद करण्यात आले. सदर कारवाई पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे व पोलीस अंमलदार मोहन मिसाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी केली. या कारवाईत आरोपींनी चोरलेल्या मोबाईल फोनसह एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे तपासी पोलीस पथकाने सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार,२९ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास यश बाबासाहेब सोनावणे यांना मारहाण करून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेल्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात  (गु.र. क्र ४१८/२०२१) गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे पोलीस पथकासह करू लागला. तपास सुरू असताना या गुन्ह्यातील आरोपींची माहिती पोलीस नाईक (बक्कल नं. ६४५२) पृथ्वीराज पांडुळे, पोलीस अंमलदार (बक्कल नं. ८९३३) मोहन मिसाळ यांना खबºयाने दिली. त्यानुसार पोलिसांनी मिठानगर भागातील संन्डे बाजारा मैदानात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अ‍ॅक्टीव्हा मोटारसायकलवरून (क्र. एमएच-१२/क्यूझेड-५१७२) येताच. पोलिसांनी त्यांना घेरले. दोघांना ताब्यात घेऊ न चौकशी केली असता त्यांनी स्वत:ची नावे इम्रान दस्तगीर सय्यद (२०), मुफिज जलाल मुल्ला (२०) अशी सांगितले तसेच आणखी एका साथीदाराच्या मदतीने सोनावणे यांना लुटल्याची माहिती कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी उमेर उमर खाने याच्या मुसक्या आवळल्या. 
 सदरची कामगिरी पुणे पोलीस दलाचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील, वानवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे, पोलीस अंमलदार अभिजीत रत्नपारखी, पोलीस अंमलदार मोहन मिसाळ  आदी पोलीस पथकाने केली.

WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *