गेल्या सात वर्षापासून फरारी असलेला सराईत आरोपी जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

गेल्या सात वर्षापासून फरारी असलेला सराईत आरोपी जेरबंद

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई

मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये गंभीर गुन्ह्या मधील आरोपी पकडणे कामी दि. १५/०६/२०२१ रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे मोसिन शेख यांना राजगड पोलीस स्टेशनच्या खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील गेल्या सात वर्षापासून फरारी असलेला आरोपी ससेवाडी परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून सतीश दिलीप सूर्यवंशी वय ३० वर्ष राहणार निर्मिती हाइट्स तिसरा मजला बालाजीनगर पुणे याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई साठी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी पुणे शहर व पुणे ग्रामीण या ठिकाणी खून, दरोड्याची तयारी, दंगा करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *