पोलीस ठाण्यातील वसुली वाल्यावर पोलीस आयुक्तांची निलंबनाची कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वसुली वाल्यावर पोलीस आयुक्तांची निलंबनाची कारवाई .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS ). प्रतिनिधी ,

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वसुली वाल्यावर पोलीस आयुक्तांची निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे . शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी न राखल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे . भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजु धोंडीबा वेंगरे यांना पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबीत केले आहे . त्याबाबतचे आदेश त्यांनी बुधवारी रात्री उशिरा निर्गमित झाल्याचे अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे .

वेंगरे हे यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात वजनदार वसुली वाले असल्याने अनेक वेळा त्या बाबतीत चर्चा ऐकायला येत होती . वेंगरे यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात झाली तरी ते वजनदार वसुली वाले म्हणूनच काम पाहत होते . अनेक वरिष्ठांशी जवळचे संबंध असलेले वेंगरे निलंबित झाल्याने चर्चेला उधाण आले आहे . तर काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंद्ये सुरू आहेत असं निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारवई केली जात आहे . मात्र , वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिन्याकाठी मलिदा गोळा करणारे तसेच पोलिस ठाण्याचं महत्वाचं कामकाज बघणारे वसुलीवाले राजे झाले आहेत . मटका , जुगार वर कारवाई केली जात आहे परंतु आज मोठ्या प्रमाणावर डिस्को डान्स पब चालू असताना त्यावर मेहरबानी दाखवणा – या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर सुध्दा कारवाईची नागरिकांकडून मागणी केली जात आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *