दुचाकी व अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार खडक पोलिसांच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दुचाकी व अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार खडक पोलिसांच्या जाळ्यात ; २ लाखाचा मुद्देमाल जप्त.

पुणे,दि.१८ :-ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री .श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या.

पुणे परिसरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या व दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.खडक पोलिसांनी आरोपीला स्वारगेट येथील वेगा सेंटर समोरील बोळात सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल (वय -२० रा. ३२९, घोरपडे पेठ, अल्हद सोसायटी चौथा मजला मोमीनपुरा कब्रस्तानच्या समोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे वाढत असल्याने खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिले होते. त्यानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस अंमलदार रवी लोखंडे व सागर घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल याने मक्का टॉवर सोसायटी मधील एक्सलंट एन्टरप्रायझेस या दुकानाचे बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या व पुणे शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणावरून अ‍ॅक्टीव्हा गाड्यांची चोरी केली असुन तो स्वारगेट वेगा सेंटर समोरील बोळात थांबलेला आहे.


मिळालेल्या माहितीच्या आधारे मा .श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा. हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपीला पकडुन त्याचाकडुन स्वारगेट येथील धोबी घाट कॅनाल लगत लपवुन ठेवलेल्या लहान मोठ्या २२ अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या व ५ अ‍ॅक्टीव्हा मोपेड गाड्या जप्त केल्या. त्यातील एका गाडीचा वापर त्याने अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरी करताना वापर केला होता. जप्त केलेल्या अ‍ॅक्टीव्हा खडक २, हडपसर १ आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून एकुण २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल हा सराईत गुन्हेगार असुन त्याचावर यापूर्वी खडक, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड पोलीस ठाणे खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडाची पुर्व तयारी, जबरी चोरी इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेंद्र डहाळे,पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ डॉ . प्रियंका नारनवरे व. सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , राहुल खंडाळे , पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग , संदिप पाटील , रवी लोखंडे , सागर घाडगे , राहुल मोरे , विशाल जाधव , हिंमत होळकर , कल्याण बोराडे , नितीन जाधव , प्रवीण गव्हाणे , समीर शेख , किरण शितोळे , महेश पवार यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *