वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगारास अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१०/०७/२०२१ वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगारास अटक करुन ०७ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड , १२०.७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने , ०१ दुचाकी असा एकुण ६,१३,४२० / – चा माल हस्तगत –

मा . श्री . कृष्ण प्रकाश साो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी चैनस्नॅचिंग व घरफोडीचे गुन्हयांना उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या .

ONLINE PORTAL NEWS 9822331526

त्या अनुषंगाने डॉ विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि श्री अभीजीत जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना व्हीजीबल पोलीसीग करून चैनस्नॅचिंग व जबरी चोरी गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या .

त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार विजय गंभीरे , विक्रम कुदळ , प्रशांत गिलवीले , नितीन गेंगजे , सुरज सुतार , विभीषण कन्हेरकर असे दि . २१/०६/२०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैनस्नॅचिंगचे व जबरी चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करणेकमी वेगवेगळया मोटार सायकलीवरून पेट्रालिंग करीत होते .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पोलीस अंमलदार विजय गंभीरे व नितीन गेंगजे यांना धनगरबाबा मंदिराजवळ एक इसम २०-२५ वर्षे वयाचा , अंगात ग्रे रंगाचे जर्किंग घातलेला पांढया रंगाच्या मोपेड दुचाकीवर बसुन संशयास्पदरित्या हालचाल करीत असतांना दिसल्याने त्यांनी त्यास अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी गाडी MH14 / JD / 8674 हिचेसह शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सौरभ अरून यादव वय २० वर्षे धंदा डीलीव्हरी बॉय रा . रुम नं . २१ , बिल्डींग नं . डब्ल्यु – ८ – ए , रमाबाई कॉलनी , आझाद चौक , सरकारी हॉस्पीटलशेजारी , निगडी पुणे असे सांगितले . त्याला धनगरबाबा परीसरात येण्याचे कारण विचारले असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली .

त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता आरोपी याने चैनिसाठी त्याची अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी गाडी MH14 / 10 / 8674 हिचा वापर करून पिंपरी चिंचवड परीसरात पायी चालत जाणाया महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली . त्याने खालील ०७ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .

१ ) वाकड पोलीस ठाणे गु.र नं . ५०९ / २०२१ भादवि कलम ३९२

२ ) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ३९६ / २०२१ भादवि कलम ३९२

३ ) चिंचवड पोलीस ठाणे गु.र.नं. २६/२०२१ भादवि कलम ३९२

४ ) चिंचवड पोलीस ठाणे गु.र नं . ७४/२०२१ भादवि कलम ३९२

५ ) चिंचवड पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२१ भादवि कलम ३९२

६ ) चिंचवड पोलीस ठाणे गु.र.नं. ९६ / २०२१ भादवि कलम ३९२

७ ) निगडी पोलीस ठाणे गुर नं . १००/२०२१ भादवि कलम ३९२

अटक आरोपी याचेकडुन तपासा दरम्यान वर नमुद चैन स्नॅचिंगचे गुन्हयातील चोरीला गेलेले १२०.७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व गुन्हा करतवेळी वापरलेली अॅक्टीव्हा दुचाकी असा एकुण ६,१३,४२० / – रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे .

नमुद आरोपी याने यु ट्युबवर चैन चोरीचे व्हिडीओ पाहुन त्याचे अनुकरण करून त्याने मोपेड अॅक्टीव्हा हीच्या दोन्ही नंबर प्लेट काढून त्यावरुन पायी चालत जाणाया महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने हिसकावुन चैन स्नॅचिंग करीत होता .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची कारवाई मा . श्री . कृष्णप्रकाश साो . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . रामनाथ पोकळे साो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त परि २ , पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत डिसले , सहा . पोलीस आयुक्त साो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे – १. श्री सुनिल टोणपे पोलीस निरीक्षक गुन्हे -२ सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि श्री . अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार विजय गंभीरे , विक्रम कुदळ , प्रशांत गिलबीले , नितीन गेंगजे , सुरज सुतार , विभीषण कन्हेरकर , बाबाजान इनामदार , बापु धुमाळ , नितीन दोरजे , प्रमोद कदम , वंदु गिरे , रविंद्र काळे , तात्या शिंदे , जावेद पठाण , कौन्तेय खराडे , अतिश जाधव , कल्पेश पाटील यांनी मिळुन केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *