येरवडा पोलीस स्टेशन ची कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक – १३/०८/२०२१ येरवडा पोलीस स्टेशन , पुणे बेकायदेशीरपणे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतूस बाळगणा – यास येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथक कडून अटक
ONLINE PORTAL NEWS
दि .१२ / ०८ / २०२१ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , दोन इसम लहुजी वस्ताद यांचे स्मारकाजवळील मोकळे जागेत , संगमवाडी , पुणे येथे बसलेले असून त्याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे . सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले असता त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी सपोनि समीर करपे व तपास पथकातील अंमलदार राहुल परदेशी , दत्ता शिंदे , तुषार खराडे , अजित वाघुले यांनी बातमीच्या ठिकाणी जावून बातमीप्रमाणे दोन इसम संशयीतरित्या थांबलेले दिसल्याने ते पोलीसांना पाहून पळून जात असताना त्यांना पकडून ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कल्याण ऊर्फ रवि बिभीषण बारंगुळे , वय २० वर्ष , रा . शितोळे हॉस्पीटल जवळ , जाधव अपार्टमेंट रुम नं . २२ , कुरकुंभ , ता . दौंड , जि . पुणे . व एक विधीसंघर्षित बालक यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आले . सदरबाबत दि . १२/०८/२०२१ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं ३९७ / २०२१ भारतीय हत्यार कायदा ३ ( २५ ) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे .
सदरची कामगिरी मा.पोलीस उप – आयुक्त , श्री.पंकज देशमुख , परिमंडळ -४ , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.किशोर जाधव , येरवडा विभाग , वपोनि श्री.युनुस शेख , येरवडा , पोनि.श्री.विजयसिंह चौहान , गुन्हे , येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि.समीर करपे , सपोनि.रविंद्र आळेकर , पोशि.राहुल परदेशी , सपोफौ.प्रदिप सुर्वे , पोहवा.दत्ता शिंदे , पोहवा.गणपत थिकोळे , पोना.तुषार खराडे , किरण घुटे , गणेश वाघ , अमजद शेख , पोशि अजित वाघुले , अनिल शिंदे , स्वप्निल मराठे यांनी केलेली आहे .