तोतया पोलीस अधिका – यास केली अटक गुन्हे शाखा युनिट -४ ची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – १३/०८/२०२१ युनिट -४ , गुन्हे शाखा , पुणे शहर तोतया पोलीस अधिका – यास केली अटक गुन्हे शाखा

ONLINE PORTAL NEWS

, युनिट ४ हद्दीत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑलआऊट दरम्यान पो . ना . साबळे , पो . ना खुणवे , पो.ना.भालचिम व पो.शि.शेलार यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे एक संशयित इसम तोतया पोलीस अधिकारी बनून पुणे , रेल्वे स्टेशन जवळील एका लॉज मध्ये रहात आहे . अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने नमूद स्टाफला सदर बातमीची खात्री करणेसाठी तात्काळ रवाना झाली असता पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मिलन लॉज येथे तो संशयित इसम मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव व पत्ता पवन ऊर्फ मिलिंद हरिषचंद्र सावंत पोलीस निरीक्षक , मुंबई वय ३७ वर्षे , रा.सावित्रीदेवी निवास गावदेवी डोबिंवली ठाणे असे असल्याचे सांगितले त्यास ओळखपत्र दाखविण्याबात सांगितले असता तो ओळखपत्र दाखविण्यास टाळाटाळ करु लागल्याने त्याचेबाबत संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता तो कोणी पोलीस अधिकारी नसल्याचे त्याने कबूल केले त्याचे लॉजच्या खोलीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात पोलीस गणवेशाचा भाग असलेले बेल्ट , पी कॅप , केन पोलीस निरीक्षक नावाच्या नेमप्लेट इत्यादी चीजवस्तू मिळून आल्या त्यामुळे सदर आरोपी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२१ भादवि कलम १७० , १७१ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस बंडगार्डन पोलीस स्टेशनचे ताब्यत दिलेले आहे . आरोपी पवन ऊर्फ मिलिंद हरिषचंद्र सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपी हा पुणे शहरात कोणत्या उद्देशाने आला होता व पुणे शहरात आणखी कोणते गुन्हे केले आहेत याबात तपास सुरु आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट- ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . जयंत राजुरकर , सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे , शोभा क्षिरसागर , पोलीस अंमलदार सुरेद्र साबळे , राकेश खुनवे , प्रविण भालचिम , अशोक शेलार यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *