ए.टी.एम.चोरी करणाऱ्या हरियाणा येथील टोळीला भोसरी पोलीसांकडुन अटक

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

ONLINE PORTEL NEWS 9822331526

दिनांक १७/०६/२०२१ ए.टी.एम.चोरी करणाऱ्या हरियाणा येथील टोळीला भोसरी पोलीसांकडुन अटक दिनांक १०/०६/२०२१ रोजी गुरुविहार / पांजरपोळ पुणे – नाशिक रोड भोसरी पुणे येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम. मशिन गॅस कटरच्या सह्याने कट करून रोख २२ ,९५,६०० / – रुपये चोरून नेले . त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६७/२०२१ . भा.द.वि. कलम ४३६,४५७,४६१,३८०,४२७.१२० ( ब ) .३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन मा . पोलीस आयुक्त श्री , कृष्ण प्रकाश सोा . यांनी भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गुन्हा उघडकीस करण्याच्या सुचना दिल्या होत्या . दिनांक १०/०६/२०२१ रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पांजरपोळ , भोसरी समोरील गुरुविहार बिल्डींगमधील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे ए.टी.एम मशीनचा पत्रा गॅस कटरच्या सह्याने पहाटे ०२/१० ते ०२/२५ दरम्यान कापुन ए.टी.एम.मशीनमधील रोख रक्कम २२.९५,६०० / – रूपये , पैस ठेवण्याच्या ट्रेसह चोरून नेली होती . भोसरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी गेले व घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपास चालु केला . चोरीच्या पध्दतीवरून अशा प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या इसमांची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असताना अशा प्रकारच्या चोऱ्या हरियाणा येथील मेवात प्रांतातील चोर करत असतात असा अंदाज बांधुन हरियाणा व राजस्थान भागातील लोक किंवा वाहने घटनेच्या वेळी आलेले आहेत का ? याचा शोध घेण्यास भोसरी पोलीसांनी सुरवात केली असता गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संशयीत ट्रक विषयी माहिती मिळाली व त्याचा शोध घेत असताना ट्रक क्र . आर.जे .०९ जी.बी .८०९३ हा घटनेच्या ठिकाणी आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर ट्रकचा शोध भोसरी पोलीस घेत असताना सदर ट्रक दिनांक १२/०६/२०२१ रोजी पुणे – नाशिक हायवेने भोसरी येथुन हरियाणा येथे जात असताना दिसला असता त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला . परंतु तो भरधाव वेगात चाकणच्या दिशेने पळुन जावु लागला असता भोसरी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास मोशी टोलनाका येथे शिताफीने ताब्यात घेवुन चालकासह ट्रक पोलीस स्टेशन येथे आणुन चालक नामे अकरम दीनमोहम्मद खान , वय २३ वर्षे , धंदा ड्रायव्हर , रा . मु.बदोपुर , मशिदीजवळ , पो . रावली , तहसील फिरोजपुर झिरका जि . नुहु ( मेवात ) राज्य हरियाणा याच्याकडे कसुन तपास केला . सदरच्या गुन्ह्याची त्याने कबुली देवुन गुन्ह्यातील चोरलेल्या रोख रक्कमेपैकी त्याचे वाट्याला आलेले ३,७४,५०० / – रुपये तसेच एक मेडीकल वापरचा ऑक्सीजन सिलेंडर काढुन दिला . तपास दरम्यान त्याने त्याचे साथीदांविषयी माहिती दिली . त्याचे साथीदार हे हरियणा येथील मेवात प्रांतात असल्याचे निष्पन्न झाले . त्याप्रमाणे भासरी पालीस स्टेशनची टीम हरियाणा येथे गेली व तेथे दोन इसमांना चौकशीकामी ताब्यात घेतले त्यांची नावे इसम नावे १ ) शौकीन अक्तर खान , वय २४ वर्षे , रा . मु.बदोपुर , पो . रावली , तहसील फिरोजपुर झिरका जि . नुहु ( मेवात ) राज्य हरियाणा ( २ ) अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर , वय ४६ वर्षे , रा . रहाडी , ता . तौरू , जि . नुहु राज्य हरियाणा असे आहे . त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली देवुन त्यांचे वाट्याला आलेली रोख रक्कम २.५०,००० / – व ए.टी.एम. मशिनमधील पैसे ठेवायचे ट्रे काढुन दिले . व त्याचे इतर तीन फरार साथीदारांची माहिती दिली . सदर ए.टी.एम. मशिन फोडुन चोरी करणाऱ्या टोळीने योजनाबध्द रितीने हरियाणा येथे प्लॅन केला व त्यामध्ये ट्रक ड्रायव्हरला सामील करून दि .०५ / ०६ / २०२१ रोजी चोरी करण्याच्या उद्देशाने पुण्याकडे निघाले . चोरी करताना गॅस कटर करीता गॅस ऑक्सीजन सिलेंडर लागेल म्हणुन मंचर येथील नाशिक – पुणे महामार्गाच्या बाजुला असलेले सिध्दी हॉस्पीटल समोर पार्क करून ठेवलेल्या अॅम्ब्युलन्स मधुन दिनांक ०६/०६/२०२१ रोजी
मध्यरात्री २/१५ वा . चे सुमारास ऑक्सीजन गॅस सिलेंडर चोरला . त्याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३६५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ .३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दोन ते तीन दिवस भोसरी परिसरातील ए.टी.एम. सेंटरची घटनेच्या अगोदर टेह्याळणी केली . पांजरपोळ समोरील एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम. सेंटर हे रात्रीच्या वेळी निर्मनुष्य व अंधार असलेल्या ठिकाणी तसेच तेथे वॉचमन व अलार्म सिस्टीम नसल्याची खात्री करून सदर ए.टी.एम. मशिन फोडण्याचे ठरविले व त्याप्रमाणे त्यांनी दि .१० / ०६ / २०२१ रोजी चोरी केली . व चोरी करीता लागणारे साहित्य जागेवरच सोडुन पैसे ठेवण्याच्या ट्रेसह २२.९ ५.६०० / – रुपये रोख रक्कम घेवुन पळुन गेले होते . सदर गुन्ह्यात एकुण ०३ आरोपींना अटक करण्यात भोसरी पोलीसांना यश आलेले असुन ०३ आरोपी फरार आहेत . अटक आरोपींकडुन दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी ६.२४.५०० / – रुपये , गुन्हा करताना वापरलेला ट्रक , गॅस कटर , घरगुती वापराची एक गॅस टाकी , तसेच दोन मेडीकल वापराचे ऑक्सीजन सिलेंडर , ए.टी.एम. मशिनचे पैसे ठेवण्याचे तीन ट्रे , दोन कोयते , तीन मोबाईल फोन असा एकणु २६,३३,३६० / रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . सदर कामगिरी मा . श्री . कृष्ण प्रकाश साो . , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . रामनाथ पोकळे सो . , अप्पर पोलीस आयुक्त , मा . इंचक इप्पर . पोलीस उपायुक्त परि . १ , मा श्री . डॉ . सागर कवडे साो . सहाय्यक पोलीस आयुक्त , पिंपरी विभाग , श्री . शंकर आवताडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोउपनि रवि भवारी , पोलीस अंमलदार राकेश बोयणे , अजय डगळे , गणेश हिंगे , बाळासाहेब विधाते , सागर भोसले , समीर रासकर , संतोष महाडीक , सागर जाधव , आशिष गोपी , गणेश सावंत , सुमित देवकर , विनोद वीर , राजु जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *