वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाची कौतुकास्पद कारवाई ५ कोटी ७४ लाख रुपयांचा अमलीपदार्थ व ६५ हजार रुपयांची रोकड जप्त

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाची कौतुकास्पद कारवाई
एमडी, ब्राऊन शुगर तस्करी करणाऱ्या दोघांना धाडले तुरुंगात
५.७४ कोटींचे अमलीपदार्थ व रोकड जप्त

ONLINE PORTAL NEWS 9822331526

मुंबई – मुंबईत एमडी, ब्राऊन शुगरचा पुरवठा करणाऱ्या दोन सराईत तस्कऱ्यांना तुरुंगात धाडण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई मुंबई पोलीस दलाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने केली. या कारवाईत ५ कोटी ७४ लाख रुपयांचा अमलीपदार्थ व ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेमुळे अमलीपदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता असल्याचे अमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

ONLINE PORTAL NEWS
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात वाढणाºया अमलीपदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त एस. विरेश प्रभू यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने अमलीपर्थविरोधी विभागाची सर्व पथके आपापल्या परीने तस्कऱ्यांवर लक्ष ठेवू लागले. विशेष शोधमोहीम राबवत असताना वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाला गोरगाव परिसरात अमलीपदार्थ तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाने गोरेगाव पश्चिम बस डेपो येथील न्यू लिंक रोडवर सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार तेथे दोन इसम आले. त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी स्वत:ची नावे संजिब सरकार (३९) व सलीम खान (४१) अशी सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता ६५ हजार रुपयांची रोकड व संजिब याच्याकडे १ किलो १०० ग्रॅम एमडी व १ किलो ८० ग्रॅम ब्राऊ न शुगर तर सलीम याच्याकडे १५० ग्रॅम एमडी आढळून आले. अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाने (गु. र. क्र. ५५/२०२१) एनडीपीएस कायदा कलम २१(क), २२(क), २७(क), २९ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
ही उत्तम कारवाई अमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे, वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारकर, पोलीस उपनिरीक्षक पावळे, पोलीस नाईक देवर्डे, पोलीस नाईक ढोले, पोलीस नाईक मांढरे, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस अंमलदार इंदुलकर, महिला पोलीस अंमलदार जगताप, पोलीस नाईक (चालक) राणे आदी पथकाने केली.


अमलीपदार्थमुक्त मुंबईसाठी नागरिकांना आवाहन
तरुणपिढी तसेच अमलीपदार्थांच्या सेवनामुळे अनेक कुटुंबिय उद्ध्वस्त झाली आहेत. मुंबई शहर अमलीपदार्थमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोणी अमलीपदार्थांचे सेवन करत असल्यास अथवा अमलीपदार्थांची विक्री करत असल्यास त्वरित ९८१९१११२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उपायुक्त, अमलीपदार्थविरोधी विभाग, मुंबई

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *