सपोनि वाहिद पठाण व क्राईम ब्रँच १० ची उत्तम कारवाई जोगेश्वरी क्राईम ब्रॅंचच्या तोतया अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या दीड लाखांची मागितली खंडणी

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

सपोनि वाहिद पठाण व क्राईम ब्रँच १० ची उत्तम कारवाई
जोगेश्वरी क्राईम ब्रॅंचच्या तोतया अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या
दीड लाखांची मागितली खंडणी

ONLINE PORTAL NEWS 9822331526

मुंबई – जोगेश्वरी क्राईम बँचचा अधिकारी असल्याचे सांगून दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कौतुकास्पद कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व मुंबई क्राईम ब्रँच युनिट १० च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे केली. कोरोना संकट काळात नोकरी गमावल्याने आरोपीने सदर मार्ग वापरला. एका खासगी कर्ज देणाऱ्या संस्थेत काम केले होते. त्या अनुभवावरून आरोपीने बोगस कागदपत्र तयार करून नवीनसिम कार्ड विकत घेतले. त्या नंबरवरून वृद्धाला धमकावले. या आरोपीला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे तपासी पथकाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून २०२१ रोजी जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या वृद्धाच्या मोबाईलवर फोन आला. जोगेश्वरी क्राईमचा अधिकारी असल्याचे सांगून त्या इसमाने वृद्धाला धमकावले. “तुमचा मुलगा कर्ज घेतल्या प्रकरणी जामीन राहिला आहे. कर्जदाराने हप्ते थकवले आहेत. दीड लाख रुपये व व्याज दिले नाहीतर घरात घुसून ठोकून काढेल, असे धमकावले. या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी (गु. र. क्र. ४६४/२०२१) भादंवि कलम ३८५, १७०, ५०४, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला.


सदर गुन्ह्याचा तपास तपास क्राईम ब्रँच १० चे पथक करू लागले. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व तपासी पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता क्राईम ब्रँचच्या तोतया पोलिसाची माहिती समजली. त्यानुसार क्राईम ब्रँच १० चे पथक ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दाखल झाले. सापळा लावून क्राईम ब्रँचच्या तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आले.


सदर कारवाई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विरेश प्रभू, गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम) संजय पाटील, क्राईम ब्रँचचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस अंमलदार जगदीश धारगळकर, अजित पाटील आदी पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *