कात्रज आंबेगाव परिसरात भेसळयुक्त तूप कारखान्याचा पर्दाफाश, १५० लिटर बनावट भेसळयुक्त तूप जप्त.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
कात्रज आंबेगाव परिसरात भेसळयुक्त तूप कारखान्याचा पर्दाफाश, १५० लिटर बनावट भेसळयुक्त तूप जप्त.
दिनांक ११/०८/२०२२ – भारती विदयापीठ पोलीस ठाणे , पुणे भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी दिनांक ०९/ ०८ /२०२२ रोजी सकाळी १०/०० वा . चे सुमारास तपास पथका भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांना गोपनीय माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मारणे व विजय पवार यांनी कळवली कि नवले ब्रिज वरून कात्रज कडे जाणाऱ्या रोड चे बाजूला आयशर शो रूम चे जवळ कुंभार यांचे बिल्डिंग मध्ये इसम नाव महेंद्रसिह देवरा रा.आंबेगाव हा भेसळयुक्त तूप हे डालडा व जेमिनी तेल मिक्स करून तयार करत आहे .तुपाची भेसळ करुन नागरीकांना विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच , मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . जगन्नाथ कळसकर व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप – निरीक्षक , शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन एफडीओचे मार्फतीने कारवाई करणे बाबत आदेशीत केले .
शिंदे हे स्टाफसह गेले असताना एका घरामध्ये मोहींदर सिंग , वय ३० वर्षे , नावाचा इसम तुपासारखा दिसणारा पदार्थ टिप व डब्या मध्ये भरत असताना दिसला , सर्व मिळून अंदाजे १५० लिटर भेसळयुक्त तूप तसेच ते तयार करण्यासाठी लागणारी सामग्री मिळून आल्याने अन्न व औषध प्रशासन यांना पुढील कारवाई करणेकामी पत्रव्यवहार करून त्यांनी सदरचा माल जप्त करून तपासणी करून रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे.
तुम्ही बनावट तूप तर खात नाही ना?
असे भेसळयुक्त अन्नपदार्थ लोकांना विकणे हा गुन्हा तर आहेच, पण याबाबत फार कोणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. मग ह्याचे घातक परिणाम लोकांना भोगावे लागतात. परिणामी कर्करोग, मूत्रपिंड यांसारख्या आजारांचे
प्रमाण खूप वाढल्याचे आपल्याला दिसते.
सन सुध चालू होणार असल्याकारणाने भेसळ युक्त पदार्थांवर अन्न व औषध विभागाचे काय उपाययोजना असणार आहेत हाही मोठा प्रश्नचिन्ह पडला आहे.
अन्न व औषधी विभागाकडून याच्यापुढे काय कारवाई होती ही लोकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.
सदरची कामगिरी श्री सागर पाटील , पोलीस उप – आयुक्त परिमंडळ -०२ , पुणे शहर , श्रीमती सुषमा चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त श्री जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्रीमती संगिता यादव , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , विजय पुराणिक , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप – निरीक्षक , शिंदे , पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा , गणेश भोसले , अवधुत जमदाडे , अभिनय चौधरी , मितेश चोरमोले , विक्रम सावंत यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad