सुट्टी तर कायमच मिळणार आहे पण स्वातंत्र्याची ७५ वी पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात येणार नाही…

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सुट्टी तर कायमच मिळणार आहे पण स्वातंत्र्याची ७५ वी पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात येणार नाही……….!

आमच्या मित्राच्या एक लेख वाचून घ्या.. श्रीकांत शिरोळे,पुणे.


१५ ऑगस्ट १९४७ मध्ये २००वर्ष राज्य करणारे इंग्रज भारत देश सोडून त्यांच्या इंग्लंड मध्ये परत गेले.त्या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण होते.त्याच वेळेस ज्या शूरवीरांनी आपल्या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिले होते त्यांच्या कुटुंबियांना व परिजनांना त्यांची आठवण येत होती असा हा दुहेरी प्रसंग होता तो..!
भारत स्वतंत्र होऊन आज बरोबर ७५ वर्ष होत आले आहेत. ज्या पिढीने स्वातंत्रा संग्राम अनुभवला किंवा त्यांच्या पुढील पिढीने तो ऐकला त्यांना आझादी ची लढाई काय होती याची माहिती आहे किंवा त्याचे महत्व पटले आहे.परंतु ज्या पिढीने freedom fight च बघितली नाही किंवा प्रत्यक्ष ऐकली नाही त्यांना त्याचे महत्व पटेलच हे सांगता येत नाही.
त्या मुळे १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दोन दिवशी शालेय विद्यार्थी सोडले तर इतर लोक सुट्टीचा पूर्ण आनंद घेतात.

वास्तविक देश स्वतंत्र झाला हे खूप अवघड काम होते जे सहज झालेले नाही त्या साठी अनेक क्रांतिकारी आपल्या तरुण वयात फासावर चढले आहेत अनेक मुली तरुण वयात वैधव्य पत्करून रुक्ष आयुष्य जगल्या आहेत.अनेक आई वडील आपल्या तरुण मुलांना हरवून बसले आहेत.या सर्वांच्या त्यागावर आज देश मोकळा श्वास घेतो आहे.


या सर्व लोकांचा त्याग आठवून तरी प्रत्येक भारतीय नागरिकाने १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी रोजी आपल्या भागातील सार्वजनिक झेंडावंदन कार्यक्रमास हजर राहून त्याला नमन केले पाहिजे,कारण आपण जो मोकळा श्वास घेतो आहे त्याच्यावर पूर्णपणे या”हुतात्म्यांचा”अधिकार आहे.


१५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दरम्यान जर सलग सुट्ट्या मिळाल्या तर बरेच तथाकथित सुधारलेले लोक पर्यटन स्थळ किंवा आपल्या गावी सुट्टी साठी निघून जातात.
आझादी काय आहे याचा जर अनुभव आजच्या पिढीला घ्यायचा असेल तर जेल मध्ये काही दिवस गेलेल्या कैद्याला विचारा मग समजेल…..!


तुम्हा आम्हाला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आयुष्यभर इंग्रज सत्तेच्या विरुद्ध बंड केले म्हणून जेल भोगलेल्या त्या वीरांना विचारा देशाचा तिरंगा म्हणजे काय आहे…..!


तेव्हा मी जास्त काही सांगणार नाही,पण एक नक्की सांगेल जर आपले आपल्या देशावर प्रेम नसेल तर त्या माणसाला स्वतःला त्या देशाचा नागरिक म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे.
आपल्या आयुष्यात सुट्टी चे क्षण खूप येतील आणि जातील सुद्धा पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा क्षण कधीच परत येणार नाही.


आणि अगदी पुढे जाऊन विचार करून असा विचार केला की,१००वर्ष पूर्ण झाल्या च्या कार्यक्रमात मी सहभागी होईल असे जर वाटत असेल तर ते दिवा स्वप्न होऊ शकते.


त्याचे कारण सुद्धा तसेच आहे मनुष्याचे आयुष्य किती आहे किती नाही कोणाला माहीत नाही.
त्या मुळे १५ ऑगस्टच्या दरम्यान जरी सुट्टी मिळत असेल तरी त्या दिवशी सकाळी न चुकता आपल्या भागातील झेंडा वंदन कार्यक्रमास हजर रहा….


आणि त्या तिरंग्या कडे एकदा एकटक पहा मग कळेल की,हा आपला स्वतःचा ध्वज मिळविण्यासाठी किती यातना सहन केल्या आहेत माझ्या भारतीय बांधवानी……!
एकदा आठवण करा त्या महापुरुषांची,डोळ्यात आपोआप पाणी येईल…!

साहेब ! पोलिसांसाठी कोरोना नाही का?


श्रीकांत शिरोळे,पुणे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *